एकाच घरात मुख्यमंत्री आणि मंत्रीपद याच्यामुळे गद्दारी; ठाकरेंना त्यांच्याच खासदाराचा घराचा आहेर 

239

तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे होते, तर पोराला मंत्री करायला पाहिजे नव्हते, पोराला मंत्री व्हायचे होते, तर तुम्ही मुख्यमंत्री व्हायला नको होते. तुम्ही खुर्ची अडवल्याने ह्यांना वाटले उद्या बाप गेल्यावर पोरग माझ्या बोकांडी बसेल. त्याच्यापेक्षा वेगळी चूल मांडली, तर काय बिघडले आणि याच भूमिकेतून ही गद्दारी झाली, असा घराचा आहेर ठाकरे गटाचेच खासदार बंडू जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

एका कार्यक्रमात बोलताना बंडू जाधव म्हणाले, अडीच वर्षाचा काळ असाच गेला. तेव्हा आम्हाला सत्तेचा लाभ व्हायला हवा होता, तो झाला नाही. याच्यासारखे दुसरे दु:ख असू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. उद्धव ठाकरेंनी पक्ष संघटनेकडे लक्ष द्यायला हवे होते. अथवा कोणाला तरी अधिकार द्यायला हवे होते. ते देऊ शकले नाही किंवा स्वत:ही लक्ष दिले नाही. म्हणून आमच्यावर हा प्रसंग ओढवला, हे सत्य आहे. त्यामुळेच ह्या चोराला संधी मिळाली, असे खासदार बंडू जाधव म्हणाले.

(हेही वाचा गड-दुर्ग रक्षण महामोर्च्याचा IMPACT: तीन महिन्यांत स्वतंत्र ‘महाराष्ट्र गड-दुर्ग महामंडळा’ची होणार स्थापना)

आठ महिन्यांपूर्वी राज्यात मोठे राजकीय नाट्य घडले. एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी केली. बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाबरोबर जात सत्ता स्थापन केली. तसेच, बहुमताच्या जोरावर शिंदे गटाला ‘शिवसेना’ पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी दिला. यानंतर शिवसेना ( ठाकरे गट) मोठा धक्का बसला आहे. अशातच ठाकरे गटातील परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी खंत व्यक्त करत पक्षाला घरचा आहेर दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.