महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर केंद्रीय निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण निकाल दिला असून यामुळे शिवसेना हे नाव आणि पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह दोन्ही एकनाथ शिंदे यांना मिळाले आहे. निवडणूक आयोगातील लढाई शिंदे गटाने जिंकली हे आता स्पष्ट झाले आहे. पण या दरम्यान एक मोठी घडामोड घडली आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटातील खासदाराने शिंदे गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
( हेही वाचा : “स्त्रीचा अपमान करणाऱ्याला देव शिक्षा देतोच”; उद्धव ठाकरेंवर कंगनाचे टीकास्त्र )
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
निवडणूक आयोगाच्या कागदपत्रांमधून हा खुलासा करण्यात आला आहे. त्यामुळे हा १४ वा खासदार सुद्धा शिंदे गटात प्रवेश करणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून निवडणूक आयोगाने जवळपास २४ ते २५ लाख कागदपत्रे घेतली होती. यामध्ये खासदार, आमदार, नगरसेवक, शाखाप्रमुख, जिल्हाप्रमुख अशा सर्वांनी प्रतिज्ञापत्र दाखल केली होती. यामध्ये ठाकरे गटाच्या खासदाराने एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे म्हटले आहे.
शिंदे गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र देणारे हे १४ खासदार ठाकरे गटात आहेत. परंतु ते गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गटापासून अलिप्त आहेत. त्यामुळे आता हा १४ खासदार कोण आणि एकनाथ शिंदेच्या गटात केव्हा प्रवेश करणार याबाबत चर्चांनी उधाण आले आहे. हा ठाकरेंसाठी मोठा धक्का आहे.
Join Our WhatsApp Community