उद्धव ठाकरे यांनी महिलेला मुख्यमंत्री करण्याबाबत विधान केल्यानंतर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यावरुन आता खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. उद्धव ठाकरेंना ज्या महिलेला मुख्यमंत्रीपद द्यायचे आहे, ती महिला घरातलीच आहे की घराबाहेरची आहे, हे बघायची गरज आहे. घरातल्याच व्यक्तीला मुख्यमंत्री पाहण्याचं स्वप्न उद्धव ठाकरे पाहत आहेत का?, असा सवाल करत नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
उद्धव ठाकरेंची खोटी अश्वासने
आतापर्यंत राज्यात महिला मुख्यमंत्री झाल्या नाहीत त्यामुळे जर राज्याला महिला मुख्यमंत्री मिळाल्या तर ती अभिमानास्पद गोष्ट आहे. पण उद्धव ठाकरे यांनी आधी अंबादास दानवे यांच्याकडील विरोधी पक्षनेतेपद महिलेला द्यावं, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. तसेच उद्धव ठाकरे हे आता खोटी आश्वासने देत असल्याचा आरोपही आखसदार नवनीत राणा यांनी केला आहे.
(हेही वाचाः ‘काँग्रेसने जेव्हा मोदींचा अपमान केला तेव्हा…’, खर्गेंच्या मोदींवरील टीकेला अमित शहांचे प्रत्युत्तर)
पदाच्या लालसेपोटी पक्ष उद्ध्वस्त केला
आमदार किंवा खासदार होणा-या महिला या खूप संघर्ष करुन पुढे येत असतात. त्यामुळे अशा महिला जर का राज्याचा कारभार सांभाळणार असतील तर ती एक चांगली बाब आहे. जर उद्धव ठाकरेंना एका महिलेलाच मुख्यमंत्री करायचे होते तर त्यांनी स्वतःकडे मुख्यमंत्रीपद घेतले नसते, अशी टीकाही नवनीत राणा यांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community