अन् नवनीत राणांच्या अश्रूंचा बांध फुटला

202

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांची तब्बल १२ दिवसांनंतर तुरुंगातून सुटका झाली आहे. दरम्यान, नवनीत राणांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना मुंबईतील लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जामीनावर सुटका झाल्यानंतर रवी राणा हनुमान चालीसाचे पठण करतच जेलमधून बाहेर आले आणि त्यानंतर नवनीत राणांच्या भेटीसाठी ते लिलावती रूग्णालयात पोहोचले.

( हेही वाचा : राज ठाकरेंच्या अल्टीमेटमनंतर सर्व धर्मगुरुंना मुंबई पोलीस आयुक्त म्हणाले… )

नवनीत राणांना अश्रू अनावर

पती रवी राणांची भेट झाल्यानंतर खासदार नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले. रवी राणा हे नवनीत राणा यांना धीर देत असलेला व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. नवनीत राणांना अश्रू अनावर झाल्याने लिलावती रूग्णालयात भावनिक चित्र निर्माण झालेले पाहायला मिळाले. नवनीत राणा यांच्या प्रकृतीची विचारपूस करून रवी राणा यांनी जेल प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. नवनीत राणा यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास सुरू झाल्यावर रूग्णालयात दाखल करण्याची विनंती त्यांनी जेल प्रशासनाला केली परंतु याची दखल घेण्यात आली नाही असा आरोप रवी राणा यांनी केला आहे.

१२ दिवसांनी पती-पत्नी भेटले

काही दिवसांपूर्वी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरुन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले होते. म्हणून मुंबई पोलिसांकडून सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. यानंतर नवनीत राणा यांना भायखळा महिला कारागृहात तर रवी राणांची तळोजा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती. आता १२ दिवसांनी जामीन मिळाल्यावर राणा दाम्प्त्याची लिलावती रूग्णालयात भेट झाली यादरम्यान नवनीत राणा भावूक झालेल्या पहायला मिळाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.