‘बाळासाहेब असते तर उभं केलं नसतं’, राऊतांच्या जंगी स्वागतावर खासदाराची प्रतिक्रिया

150

शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांबाबत शिवसेनेत नाराजीचं वातावरण पसरलं आहे. संजय राऊत यांचे गुरुवारी संध्याकाळी मुंबई विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी राऊतांचे ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करत, शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला.

शिवसैनिकांच्या या शक्तिप्रदर्शनावर आता विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी यावरुन शिवसैनिकांवर घणाघात केला आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर राऊतांसारख्या घोटाळेबाजांना त्यांनी उभं केलं नसतं, अशा शब्दांत राणा यांनी टीका केली आहे.

(हेही वाचाः गुंड मारणेचेही असेच स्वागत झाले होते! राऊतांच्या शक्तीप्रदर्शनावर भाजपची खोचक टीका )

बाळासाहेब असते तर हे झालं नसतं

शिवसैनिकांचं डोकं ठिकाणावर नाही. ज्यांनी भ्रष्टाचार केला, ज्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या पैशांचा दुरुपयोग केला त्यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. पुराव्यासहीत त्यांची संपत्ती ईडीने ताब्यात घेतली आहे, त्यांचं आज शिवसैनिक धुमधडाक्यात स्वागत करत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर या गोष्टी महाराष्ट्रात कधीही घडल्या नसत्या. भ्रष्टाचारी लोकांना बाळासाहेबांनी कधीही उभं केलं नसतं. त्यामुळे शिवसैनिकांनी जरा विचार करुन वागावं, अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केली आहे.

(हेही वाचाः “राऊतांनी मला ‘सामना’ कार्यालयात धमकावले अन् 25 लाख घेतले”)

राऊतांचे जंगी स्वागत

ईडीने संजय राऊत यांचा दादर येथील फ्लॅट आणि अलिबाग येथील ८ भूखंड जप्त करत त्यांच्यावर कारवाई केली. त्यानंतर दोन दिवसांनी संजय राऊत दिल्लीहून मुंबईत परतले, त्यावेळी मुंबई विमानतळावर मोठ्या संख्यने शिवसैनिक राऊतांच्या स्वागतासाठी जमले होते. यावेळी खासदार विनायक राऊत, राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत, आमदार सुनील प्रभू हे उपस्थित होते. मुंबई विमानतळावर शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. डरेंगे नही, झुकेंगे नही, अशा घोषणा देण्यात येत होत्या. तसेच संजय राऊत यांचा ‘योद्धा’ म्हणून उल्लेख करण्यात आलेले बॅनर दाखवण्यात आले होते.

(हेही वाचाः ‘हिंमत असेल तर नजरेला नजर भिडवा’, शहांचे भर सभागृहात राऊतांना आव्हान)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.