गेल्या बारा वर्षांपासून खासदार नवनीत राणा आणि रवी राणा हे होळीचा सण आदिवासी बांधवांसोबत साजरा करत आहेत. आदिवासी बांधवांसाठी होळी हा सगळ्यात महत्वाचा असतो. राणा दाम्पत्य तब्बल पाच ते सात दिवस मेळघाटातील आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी करतात. यावर्षी देखील होळीसाठी आदिवासी भागात गेले असून खासदार नवनीत राणा यांनी मेळघाटातील महिलांसोबत आदिवासी गादली नृत्यावर ताल धरला तर आमदार रवी राणा यांनी ढोलकी वाजून सहभाग घेतला. यावेळी मेळघाटातील आदिवासी तरुणांना नवनीत राणा यांच्यासोबत सेल्फीचा मोह आवरता आला नाही.
होळीच्या फगव्यासोबतच आदिवासींना विकासकामे समर्पित करून खासदार नवनीत रवी राणा आदिवासींच्या आनंदात भर घालण्याची परंपरा जोपासत आहेत. आदिवासींना मूलभूत सोयी सुविधा देणे व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हाच ध्यास बाळगून खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा आपल्या युवा स्वाभिमानी शिलेदारासह ४ मार्चपासून ८ मार्चपर्यंत मेळघाटातील अतिदुर्गम गावात जावून आदिवासींच्या समवेत होलिकोत्सव साजरा करत आहेत.
यावेळी आदिवासी गावातच मुक्काम करत असून होलिकापुजन, आदिवासी नृत्य, व्हॉलीबॉल किट, क्रिकेट किट, फगवा वाटप आणि कोट्यवधी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करून राणा दाम्पत्य सलग १२व्या वर्षी आदिवासी संस्कृती आणि परंपरा जोपासण्यासाठी मेळघाटात आहे. नवनीत राणा यांना लोकसभेमध्ये सर्वात जास्त मते मेळघाटातील आदिवासी भागातून मिळाली आहेत.
(हेही वाचा – भाजप, मुख्यमंत्री शिंदे आणि निवडणूक आयोगावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल; खेडमधील सभेतून जनतेला भावनिक हाक)
Join Our WhatsApp Community