‘मी घरात राणांची पत्नी पण बाहेर…’, राणा-कडू वादावर नवनीत राणांची प्रतिक्रिया

116

आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील मिटलेला वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या हस्तक्षेपानंतर या वादावर पडदा पडलेला असतानाच रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक वादळ उठले आहे.

त्यावरुन आता रवी राणा यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी एक लोकप्रतिनिधी असल्यामुळे याविषयी मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे.

काय म्हणाल्या नवनीत राणा?

घरी मी रवी राणा यांची पत्नी असले, तरी बाहेर मी केवळ एक लोकप्रतिनिधी आणि लोकसेवक आहे. त्यामुळे मला या वादावर काहीही बोलायचे नाही. बच्चू कडू आणि रवी राणा हे दोघेही मला सिनियर आहेत. त्यांना माझ्यापेक्षा जास्त कळतं. त्यामुळे याबाबत माझ्यापेक्षा तेच योग्यप्रकारे बोलू शकतील, अशी प्रतिक्रिया खासदार रवी राणा यांनी दिली आहे.

(हेही वाचाः ‘…तर घरात घुसून मारायची हिंमत माझ्यात आहे’, राणांचा कडूंना थेट इशारा)

राणा-कडू यांच्यातीव वाद पेटला

आमदार बच्चू कडू यांच्या मेळाव्यातील भाषणानंतर आमदार रवी राणा यांनी दम देणा-यांना घरात घुसून मारू असा थेट इशारा दिला होता. त्यानंतर रवी राणांचं मी स्वागत करतो, त्यांनी तलवार घेऊन यावं, मी फूलं घेऊन तयार आहे. त्यांना माझ्या शरीराचे किती तुकडे करायचे आहेत ते त्यांनी सांगावं. मी त्यांना हात देखील लावणार नाही. मी त्यांच्या हातून मरण्यासाठी तयार आहे. ते कधी माझ्या घरी येणार आहेत ते त्यांनी सांगावं मी त्यादिवशी मी घरात तयार राहतो. त्यांना वाटत असेल की मला चौकात मारावं, तर मी चौकात यायला देखील तयार आहे, अशी खोचक प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी राणांच्या विधानावर दिली होती.

(हेही वाचाः ‘मी रवी राणांकडून मरायला तयार आहे’, बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.