दाऊद आणि पाकिस्तानमधील गँगशी ‘त्या’ महिलेचे संबंध, NIA कडून तपास करा; राहुल शेवाळेंचे स्पष्टीकरण

152

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी एका फॅशन डिझायनरचे शोषण केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. या प्रकरणाचे विधानसभेतही पडसाद उमटले. दरम्यान, ठाकरे गटाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली जात आहे. अशातच खासदार राहुल शेवाळेंनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. सदर फॅशन डिझायनर महिलेचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि पाकिस्तानातील गँगशी संबंध असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट राहुल शेवाळेंनी केला आहे. यासह या प्रकरणाची एमआयए NIA मार्फत चौकशाी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

(हेही वाचा – दहशतवादाविरोधात SIA ची कारवाई! फुटीरतावादी नेत्याचं घर सरकारनं केलं सील)

शेवाळेंनी आज, रविवारी पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक माहिती दिली. तसेच या महिलेची पोलखोल करत शेवाळेंनी काही ऑडिओ क्लिप ऐकवून या महिलेची आणि राष्ट्रवादी काँग्रेसचीही पोलखोल केली. यावेळी माझा संसार आणि राजकीय आयुष्य खराब करण्याचा प्रयत्न असल्याचे शेवाळे म्हणाले. आरोप करणारी महिला स्वतः बार डान्सर आहे. तिचे कुटूंब गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहे. मला पैशासाठी ब्लॅकमेल करण्यात आले. माझ्यावरील सर्व आरोप आणि व्हायरल करण्यात आलेले सर्व फोटो व्हिडीओ खोटे आहेत. या महिलेचा पाकिस्तानी ग्रृप आहे. त्यांच्या गँगमध्ये फराह नावाची पाकिस्तानी महिला आहे. राशीद नावाचा पाकिस्तानी एजंटही आहे. ही फॅशन डिझायनर महिला दाऊद गँगसोबत काम करत आहे. रईस आणि जावेद छोटाली नावाच्या व्यक्तीसह ती काम करत असून तिचे संबंध आहे. हे साधंसुधं प्रकरण नाही हा आंतरराष्ट्रीय कट असल्याचे शेवाळेंनी म्हटले आहे.

पुढे ते असेही म्हणाले की, माझा संसार ठाकरेंनी वाचवला असे युवा सेनाप्रमुख सांगताय, पण या महिलेला युवासेनाप्रमुखच पाठिशी घालत आहेत. असे केल्याने कोणाचे लग्न वाचते का? एखाद्याचे आयुष्यचं बर्बाद होईल ना… युवासेनाप्रमुखांची विधानेच तशी आहेत. या प्रकरणात माझ्यावर गुन्हा दाखल व्हावा असा राष्ट्रवादीचा सुरूवातीपासूनच प्रयत्न होता. पण उद्धव ठाकरेंनी या प्रकरणाची सर्व खात्री करून घेतली होती. या महिलेची कौटुंबिक पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे. तिचा भाऊ गंभीर गुन्ह्यात तुरूंगात आहे. मुंबई पोलिसांना सापडत नाही ते तिच्या पत्त्यावरही जाऊन आले. राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला मात्र ती सापडली. ती राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला कशी सापडली, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी पक्ष या प्रकरणाच्या पाठिशी आहे. राष्ट्रवादीचा दाऊदशी सबंध आहे. त्यांचा मंत्री दाऊदशी संबंधित असल्याने तुरूंगात आहे. महिलेच्या वकिलाच्या संभाषणातही नवाब मलिकांचा उल्लेख आहे. यावरून काय तो अर्थ काढता येतो, असेही त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.