मुंबई-शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांच्या मातोश्री जयश्री रमेश शेवाळे यांचे रविवार १९ नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता मानखुर्द येथील राहत्या घरी निधन झाले.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांनंतर त्यांना गुरुवारी म्हणजेच १६ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर त्या घरीच होत्या. (MP Rahul Shewale)
(हेही वाचा – Hingoli Earthquake: हिंगोली येथे भल्या पहाटे भूकंपाचे धक्के)
मात्र रविवार संध्याकाळी राहत्या घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तातडीने त्यांना चेंबूरच्या साई रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (MP Rahul Shewale)
त्या 73 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात अविनाश शेवाळे, नवीन शेवाळे आणि खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) अशी 3 मुले, वर्षा शेवाळे, माजी नगरसेविका वैशाली शेवाळे, माजी नगरसेविका कामिनी शेवाळे या 3 सूना आणि एकूण 6 नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज म्हणजेच सोमवार २० नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता ट्रॉम्बे कोळीवाडा येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
(हेही वाचा – Khalistanists Boycott: एअर इंडियाच्या विमानांवर खलिस्तानवाद्यांचा बहिष्कार)
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 11 वाजता अंत्ययात्रा निघेल आणि दुपारी 12 वाजता ट्रॉम्बे कोळीवाडा येथील हिंदू स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार केले जातील. (MP Rahul Shewale)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community