रामनवमीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरामध्ये बुधवारी मध्यरात्री तुफान राडा झाला. यावेळी या जमावाने पोलिसांच्या अनेक गाड्या जाळल्या, दगडफेक केली. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांसह काहीजण जखमी झाले. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तरीही राडा थांबला नाही. त्यामुळे पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि त्यानंतर आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. पण या घटनेवरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहे. शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्र केले.
नक्की काय म्हणाले संजय राऊत?
प्रसारमाध्यमांसोबत बोलताना छत्रपती संभाजीनगरमधील घटनेवर संजय राऊत म्हणाले की, या सरकारचा एकमेव हेतून आहे, राज्यामध्ये अशांतता निर्माण व्हावी. दंगली घडाव्यात. मुळात गृहमंत्रीपद, गृहमंत्रालय अस्तित्वात आहे की नाही हाच प्रश्न आहे. मी वारंवार सांगतो ते फडणवीस दिसत नाहीयेत. हे सुद्धा फडणवीस नैराश्य, वैफल्यग्रस्तातून काम करताना दिसतायत. त्याची कारणे शोधावी लागतील. आणि ती कारणे जाहीरपणे सांगण्यासारखी नाहीयेत. संभाजीनगरमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली हे सरकारचे अपयश आहे. महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अशाप्रकारचे वातावरण निर्माण व्हावे, ही या सरकारची इच्छा आहे. आणि त्यासाठी मिंधे गटाच्या अनेक टोळ्या काम करतात.
(हेही वाचा – छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात तुफान राडा; पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ आणि हवेत गोळीबार)
Join Our WhatsApp Community