राजधानीत मराठी माणसाची उत्तम सोय व्हावी यासाठी महाराष्ट्र सदन बांधण्यात आले आहे. तसेच नवनियुक्त खासदारासाठी शासनाच्या वतीने येथेच त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येते. मात्र सध्या तात्पुरते वास्तव्य असलेल्या खासदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. या संदर्भातील पत्र खासदार रवींद्र वायकर यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनाच लिहिले आहे. या पत्राची जोरदार चर्चा सध्या महाराष्ट्र सदनात रंगली आहे. (Maharashtra Sadan)
एरवी देखील मराठी व्यक्तीला येथे बऱ्याच अडचणींचा सामना करावा करावा लागतोय. पण अधिकारी वर्ग फारसा लक्ष देत नाही. मात्र खासदार प्रभावीत झाल्यामुळे संपूर्ण यंत्रणाच खळबळून जागी झाली आहे. महाराष्ट्रमधून कुणीही कामानिमित्त दिल्ली दरबारी आले तर सर्वात आधी महाराष्ट्र सदन आठवते. मात्र त्याच सदनात अनेकदा मराठी जणांची उपेक्षित वागणूक देण्यात येते. या प्रकारावर शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर चांगलेच संतप्त झाले. याबाबत त्यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे यांनाच पत्र लिहून तक्रारींचा पाढाच वाचला. (Maharashtra Sadan)
(हेही वाचा – तुम्ही Tarapith भेटीचे नियोजन करत आहात ? मग ही माहिती अवश्य वाचा)
सध्या सदनातील खोल्यांमध्ये नळांद्वारे मिळणारे गरम पाणी बंद आहे. त्यामुळे सदनात वास्तव्यास आसलेल्या खासदार, नागरिकांना नाईलाजाने ऐन पावसाळा आणि हिवाळ्यात थंड पाण्याचे अंघोळ करावी लागत आहे. सदनातील खोल्यांमध्ये राहणाऱ्यांना गरम पाणी मिळावे. नळाला शुद्ध पाणी मिळावे. तसेच येथील खोल्यांमधील जुन्या झालेल्या गाद्या, फर्निचर बदलावे, असेही वायकरांनी म्हटले आहे. महाराष्ट्र सदनातील कॅन्टीनमधील खाद्यपदार्थांबाबतही वायकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. येथील खाद्यपदार्थांचे दर ही जास्त आहेत. या पदार्थांचा दर्जाही चांगला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर ठोस निर्णय घ्यावा, असेही वायकरांनी मुख्यमंत्री शिदेंना आवर्जून सूचवले आहे. (Maharashtra Sadan)
महाराष्ट्र सदनातील सुविधांचा पुरता बोजवारा उडाल्याचा आरोप खासदार वायकरांनी केला आहे. येथील कँटीन, वाय-फाय, गाद्या, तसेच अंघोळीचे पाणी याबाबत तक्रारी असूनही त्यावर कार्यवाही होत नसल्याकडेही वायकरांनी लक्ष वेधले आहे. येथील असुविधांमुळे मनस्ताप होत असल्याचेही वायकरांनी अवर्जून सांगितले. पत्रात त्यांनी सदनातील सर्व असुविधांचा उल्लेख करत याकडे लक्ष देण्याची विनंतीही त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे (CM Eknath Shinde) केली आहे. वायकर म्हणाले, दिल्लीत महाराष्ट्र शासनाने सुमारे १३२ खोल्यांचे महाराष्ट्र सदन उभारले आहे. या सदनाचा खासदारांना अधिवेशन काळात किंवा नागरिकांनाही उपयोग होतो. ही वास्तू चांगली आहे, मात्र या सदनामध्ये अनेक असुविधा आहेत. येथे खासदारांसाठी वेगळा सेल असावा. खासदारांची संख्या पाहता येथील संगणकांची संख्या वाढवावीत. टंकलेखनावर प्रभुत्व असणाऱ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशी अपेक्षाही वायकरांनी व्यक्त केली. (Maharashtra Sadan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community