Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj) ३४५ व्या शिवपुण्यतिथी दिनी अभिवादन केले. यावेळी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (MP Chhatrapati Udayanraje Bhosale Raigad) यांनी अमित शाहांकडे प्रमुख मागण्या केल्या आहेत. ते म्हणाले की, आज आपण लोकशाहीत आहोत. त्याकाळी त्यांनी लोकांचा सहभाग राज्यकारभारात असला पाहिजे हा विचार दिला. शिवाजी महाराजांनी त्या काळात समतेचा विचार दिला. सर्व धर्म समभावाचा विचार केला त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. आपले आयुष्य रयतेसाठी पणाला लावले असे खासदार उदयनराजे भोसले यांनी १२ एप्रिलला रायगड किल्ल्यावरून म्हणाले.
(हेही वाचा – UPI Down : यूपीआय पुन्हा डाऊन! एका महिन्यात दुसऱ्यांदा वापरकर्त्यांना नाहक त्रास)
या मागण्या केल्या
1) शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊँ माँसाहेबांचा होणारा अवमान टाळण्यासाठी एक कायदा करावा. त्यात दोषींना दहा वर्षे जेल व्हावी.
2) शिवाजी महाराज यांचा शासनमान्य इतिहास शासनाने प्रकाशित करावा.
3) सिनेमॅटीक लिबर्टीबाबत एक सेन्सॉर बोर्ड स्थापन करावे. एखादा कादंबरी लिहितो. मात्र, त्याला कुठलेही पुरावे नसतात. त्यामुळे शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि युगपुरुषांबद्दल गैरसमज निर्माण होतो. हे टाळण्यासाठी सेन्सॉर बोर्ड स्थापन करावे.
4) शिवस्वराज्य सर्किटची स्थापन करावी. रेल्वे मंत्र्यांनी कालच ही घोषणा केली आहे. शिवाजी महाराजांचे दिल्लीत स्मारक व्हावे.
(हेही वाचा – आता शिवरायांचा अवमान करणाऱ्यांची खैर नाही ; CM Devendra Fadnavis यांची अमित शाहांसमोर मोठी मागणी)
5) शहाजी राजे आणि जिजाऊ माँसाहेबांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वराज्याचा विचार शिवाजी महाराजांमध्ये उतरवला. शहाजी महाराजांची समाधी दावणगिरी येथे आहे. त्यासाठी केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा.
6) पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या (PM Narendra Modi) हस्ते अरबी समुद्रात शिवस्मारकाचे भूमिपूजन झाले. गव्हर्नर हाऊसला लागून 48 एकर जागा आहे. तिथे शिवाजी महाराज यांचे स्मारक व्हावे. अशा मागण्या खासदार उदयनराजे भोसले यांनी केल्या आहेत .
हेही पहा –
Join Our WhatsApp Community