संपानंतर दीड महिन्यातच ‘लालपरी’ची ५२१ कोटींची कमाई!

93

गेल्या पाच महिन्यांपासून एसटी आगारात थांबलेली लालपरी २२ एप्रिलनंतर राज्यभरात पुन्हा जोमाने सुरू झाली. तब्बल पाच महिने संपकरी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर गेल्या दीड महिन्यात ५१२ कोटींची कमाई करून खेड्यापाड्यातील सामान्य प्रवाशांचा विश्वास असल्याचे लालपरीने दाखवून दिले.

का होती लालपरी ठप्प…

कर्मचाऱ्यांनी तब्बल पाच महिने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीन करा, या मागणीसाठी लढा दिला. विलीनीकरण झाले नाही, पण वेतनवाढ आणि पगाराची शाश्वती कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्र्यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, २२ एप्रिलपासून बहुतेक कर्मचारी कामावर हजर झाले असून सध्या ९१ हजार कर्मचारी रुजू झाले आहेत. लालपरीवरील प्रवाशांचा विश्वास उडाला असून पुन्हा लालपरी पुन्हा धावू शकणार नाही, असे काहींनी म्हटले. पण, काही दिवसांतच लालपरी पुन्हा सुसाट धावू लागली आहे. २२ एप्रिलनंतर सुरवातीला साडेबारा हजार बसगाड्या मार्गांवर धावत होत्या आणि दररोजचे उत्पन्न साडेतेरा कोटींपर्यंत होते. पण, १५ दिवसांची ही स्थिती बदलली आणि दररोज १४ हजार बसगाड्या मार्गांवर धावत असून दररोजचे उत्पन्न १७ कोटींवर पोहचले आहे.

(हेही वाचा- ‘लालपरी’च्या संपानंतरही एसटीच्या २१० बसफेऱ्या बंदच!)

दरम्यान,  १ एप्रिल ते १५ मे या दीड महिन्यांतच लालपरीला ५२१ कोटींचे उत्पन्न मिळाले. कर्मचारीही उत्पन्न वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत. जेणेकरून पगार वेळेत होईल हा त्यामागील हेतू असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे. खासगी वाहनांचे दर परवडणारे नसल्याने लालपरीचाच सर्वसामान्यांना मोठा आधार आहे. मागील १५ दिवसांत प्रवाशांची संख्या वाढल्याने सर्व मार्गांवर धावणाऱ्या बसगाड्यांमध्ये सोळाशेंची वाढ झाली आहे. दुसरीकडे या १५ दिवसांतच लालपरीला २२९ कोटींपर्यंत उत्पन्न मिळाल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.