एसटी संप : चंद्रकांत पाटलांचा भरवसा अजित पवारांवर!

122

मागील ४ महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाचे कामगार संपावर आहेत. या संपाचा तिढा सुटता सुटेना, अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत संपकरी कामगारांना ३१ मार्चपर्यंत कामावर रुजू होण्याचा अल्टिमेटम दिला आहे. त्याचा संदर्भ देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एसटी कामगारांचा संप मिटवण्याची धमक केवळ अजित पवार यांच्यातच आहे, असा विश्वात व्यक्त केला.

(हेही वाचा अजित पवारांचा अल्टिमेटम एसटी कर्मचा-यांनी धुडकावला)

…तर कठोर कारवाई करू!

एसटीचा प्रश्न आता सुटलेला आहे. याबाबत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत विवेचन केले, त्यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना शेवटची संधी देण्यात आली आहे. त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून पगारवाढही केली गेली आहे. वर्षाला सुमारे ७५० कोटींचा बोजा सरकारवर पडणार आहे. पगार वेळेत होणार आहेत. त्याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत जर कर्मचाऱ्यांनी ऐकले नाही, तर त्यानंतर जे कामावर येणार नाहीत, त्यांच्याबाबत कठोर कारवाईची भूमिका घेतली जाईल, असा इशारा अजित पवार यांनी दिला.

(हेही वाचा बडतर्फ एसटी कामगारांना पुन्हा घेणार सेवेत…पण एकच अट!)

अजित पवारांना चिठ्ठी पाठवली 

मी अजित पवारांना सभागृहात एसटी संप संपवा आणि त्याचे श्रेय घ्या, अशी चिठ्ठी पाठवली. मी गिरणी कामगाराचा मुलगा आहे. दत्ता सामंत यांच्या संपामध्ये १ लाख घरे उद्धवस्त झाली हे आजही मला आठवत आहे. त्यामुळे पुन्हा एक लाख घरे उद्धवस्त होतील. त्यामुळेच मी त्यांनी चिठ्ठी पाठवली कारण त्यांच्याकडून आशा आहेत. अजित पवारांमध्ये धमक आहे. चार महिने एसटी कर्मचारी त्रस्त आहेत, त्यामुळे तुम्ही प्रेमाने बोललात तर सगळे येतील, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.