एसटी महामंडळाकडून (MSRTC) दर वर्षी दिवाळीत १० टक्के भाडेवाढ केली जाते. मात्र, प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. महामंडळाने जाहीर केलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. यंदा देखील २५ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान एका महिन्यासाठी महामंडळाने एसटीची भाडेवाढ लागू केली होती.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. महामंडळाने भाडेवाढ रद्द करत एसटीच्या प्रवाशांना दिलासा दिला आहे. राज्यभरातील प्रवाशांना या निर्णयामुळे फायदा होणार आहे. दिवाळीत केली जाणारी हंगामी भाडेवाढ रद्द केल्यामुळे एसटी महामंडळाला (MSRTC) मिळणारी अतिरिक्त रक्कम यंदा मिळणार नाही. मात्र, या निर्णयाचा प्रवाशांना फायदा होणार आहे. या भाडेवाढीमुळे एसटीचा लांब पल्ल्याचा प्रवास महागणार होता. परंतु, आता एसटीच्या तिकीटाचे दर ‘जैसे थे’ अवस्थेत राहतील.
(हेही वाचा Baba Siddique Murder प्रकरणी 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपीच्या नावाची चर्चा
महिला बचत गटांना स्टॉल उघडण्यास जागा
एस.टी. महामंडळाच्या (MSRTC) प्रत्येक बस स्थानकांवर त्या परिसरातील महिला बचत गटांना आपले स्थानिक पदार्थ विकण्यासाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारुन १०X१० आकाराचा स्टॉल उपलब्ध करून दिला जाणार आहे. उपरोक्त निर्णयाबरोबरच नवीन २५०० साध्या बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करणे तसेच १०० डिझेल बसेसचे प्रायोगिक तत्त्वावरील इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करणे अशा विविध विषयांना या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली.
Join Our WhatsApp Community