एसटी कामगारांचे वेतन रखडले; अजित पवारांनी सदावर्तेंचे कान उपटले 

150
सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांचे वेतन रखडले आहेत. त्यामुळे आता अजित पवार यांनी यावर थेट एसटी कामगारांचे आंदोलन चिघळवणाऱ्या नेत्यांना खडसावले आहेत. त्यात वकील गुणरत्न सदावर्ते यांना उद्देशून अजित पवार यांनी, ‘एक तर म्हणायचा डंके की चोट पे करुंगा. डंके की चोट पे करुंगा. आता डंका कुठे गेला नि चोट कुठे गेली’, अशा शब्दांत त्यांनी सदावर्ते यांना टोला हाणला.

काय म्हणाले अजित पवार? 

एसटीच्या वेळी आमचे सरकार असताना ही शहाणी काही आमदार तिथे जाऊन झोपत होती. घोषणा देत होते. एक तर म्हणायचा डंके की चोट पे करुंगा. डंके की चोट पे करुंगा. आता डंका कुठे गेला नि चोट कुठे गेली. आता एसटीच्या कर्मचाऱ्यांचे पगार होत नाही. जबाबदार कोण, असा सवाल अजित पवार यांनी केला. सरकार आमचे असले की रात्रंदिवस तुम्ही तिथे आंदोलन करणार. एसटी बंद होती, तर पगाराला अडीच कोटी रुपये देत होतो. उपकार केले नाही. कारण त्यांची पण कच्ची-बच्ची घरात आहेत. कशी ही माणसे बदलतात बघा. सरडा कसा बदलतो. यांचे सरकार आले. आता बोलायला तयार नाही. मूग गिळून गप्प बसले आहेत, असेही अजित पवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.