एसटीचा संप : खासगी ट्रॅव्हल्सकडून लूटमार! तिकीट दर ऐकून व्हाल थक्क 

दिवाळीला गावाला गेलेले किंवा गावावरून मुंबईला आलेल्या हजारो प्रवाशांनी आता खासगी ट्रॅव्हल्सची वाट धरली आहे.

73

राज्यात कालपर्यंत एसटी महामंडळाच्या काहीच कामगार संघटनांचा संप सुरू होता, मात्र दिवाळी संपताच सर्वच्या सर्व संघटना संपात उतरल्या आणि राज्यभरात एसटीच्या गाड्या आगारात उभ्या राहिल्या. सोमवारी सकाळपासून एसटीचा शंभर टक्के संप सुरु झाला. त्याचा गैरफायदा खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी लागलीच घेण्याचा निर्णय घेतला आणि काही तासांत खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकिटांचे दर अव्वाच्या सव्वा वाढले.

तिकीट खरेदी केल्यावर रद्द होणार नाही! 

सध्या एसटीच्या सर्व आगारांमध्ये कामगारांनी संप सुरु केला आहे. महामंडळाचे राज्य सरकारमध्येच विलीनीकरण करा, या एकाच मागणीसाठी या संघटनांनी आता बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे सर्व सामान्यांची गैरसोय सुरु झाली आहे. एसटी आगाराबाहेर प्रवाशांची गर्दी झाली आहे. दिवाळीला गावाला गेलेले किंवा गावावरून मुंबईला आलेल्या हजारो प्रवाशांनी आता खासगी ट्रॅव्हल्सची वाट धरली आहे. त्याचा नेहमीप्रमाणे ट्रॅव्हल्सवाल्यांनी गैरफायदा उचलण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे एकदा खरेदी केलेले तिकीट पुन्हा रद्द करता येणार नाही, अशी दटावणी करूनच ट्रॅव्हल्सवाले तिकिटांचे आरक्षण करू लागले आहेत. त्यामुळे जर एसटीचा संप मिटला तरी प्रवाशांना नाईलाजास्तव ट्रॅव्हल्सनेच प्रवास करावा लागणार आहे, त्यामुळे ट्रॅव्हल्सवाल्यांनी अशी शक्कल लढवली आहे. मुंबईहून सातारा, कोल्हापूर, जळगाव या भागात जाणाऱ्या ट्रॅव्हल्सवाल्यांनी तिकीट दर भरमसाठ वाढवले आहेत.

(हेही वाचा : आता संपूर्ण एसटी होणार ठप्प?)

संप चालेले तसे दर वाढणार

सध्या तिकीट आरक्षण कारण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सवाले थेट सांगत आहेत की, आजचे दर आणि  उद्याचे दर वेगळे असू शकतात, सध्या एसटीचा संप सुरु आहे, त्यामुळे ट्रॅव्हल्स कंपन्या तिकिटांचे दर वाढवत आहेत. उद्याही संप सुरु राहिला तर तिकीट दर आणखी वाढलेले असतील, असे ट्रॅव्हल्सच्या गाड्यांच्या तिकिटांचे आरक्षण करणारे एजंट सांगत आहेत.

असे आहेत दर 

आताचे दर आणि कंसात पूर्वीचे दर 

  • बोरिवली ते महाबळेश्वर     एसी सीटिंग ७०० (५००)
  • बोरिवली ते महाबळेश्वर     एसी स्लीपर १५०० (११००)
  • बोरिवली ते जळगाव         एसी सीटिंग १३०० (९००)
  • बोरिवली ते जळगाव        एसी स्लीपर  २००० (१५००)
  • बोरिवली ते कोल्हापूर       एसी सीटिंग  ९०० (६००)
  • बोरिवली ते कोल्हापूर       एसी स्लीपर  १७०० (१३००)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.