केंद्रीय मंत्रिपद टिकवण्यासाठी मुख्तार अब्बास नक्वींसमोर दोन पर्याय

130

भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना राज्यसभेचे तिकीट मिळाले नाही. त्यांचा कार्यकाळ 4 जुलैला संपणार आहे. 4 जुलैला जरी त्यांचा कार्यकाळ संपत असला, तरी ते पुढील सहा महिने मंत्रिपदावर राहू शकतात. परंतु त्यांना या काळात राज्यसभा किंवा लोकसभेचे सदस्यत्व मिळवावे लागणार आहे. यामुळे आता नक्वींसमोर दोन पर्याय उरले आहेत.

रामपूरमध्ये लोकसभा पोटनिवडणूक होणार

भाजपने मुख्तार अब्बास नक्वी यांना राज्यसभेची उमेदवारी दिली नाही. त्यामुळे नक्वींसमोरील एक मार्ग बंद झाला आहे. नक्वी हे छत्तीसगढच्या कोट्यातून राज्यसभेवर गेले होते. ते उत्तर प्रदेशमधून लोकसभेवर जाऊ शकतात. आझम खान यांनी राजीनामा दिल्याने रामपूरमध्ये लोकसभा पोटनिवडणूक होणार आहे. नक्वी यांना रामपूरमधून उतरवले जाण्याची चर्चा होऊ लागली आहे. नक्वी हे 1998 मध्ये या जागेवरुन खासदार झाले होते. परंतु, 1999 आणि 2009 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

( हेही वाचा: राऊत आगलावे; ठाकरेंनंतर छत्रपतींच्या घरात आग लावली, नितेश राणेंचा राऊतांवर हल्लाबोल )

राष्ट्रपती नियुक्त खासदार

दुसरा पर्याय म्हणजे राष्ट्रपती नियुक्त खासदारांचा. राज्यसभेत 12 राष्ट्रपती नियुक्त सदस्य असतात. सध्या पाचच सदस्य आहेत. सात जागा रिकाम्या आहेत. जर नक्वी रामपूरमधून लोकसभेत जाऊ शकले नाहीत, तर राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून ते राज्यसभेत जाऊ शकतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.