Mukhyamantri ladki Bahin Yojana: पुढच्या अर्थसंकल्पातही युती सरकार लाडक्या बहिणींसाठी तरतूद करणार – फडणवीस

145
Mukhyamantri ladki Bahin Yojana: पुढच्या अर्थसंकल्पातही युती सरकार लाडक्या बहिणींसाठी तरतूद करणार - फडणवीस
Mukhyamantri ladki Bahin Yojana: पुढच्या अर्थसंकल्पातही युती सरकार लाडक्या बहिणींसाठी तरतूद करणार - फडणवीस

राज्याच्या अर्थव्यवस्थेत महिलांची भागीदारी असावी असा केंद्र आणि महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न आहे. यामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्थाही वेगाने वाढणार असून महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र घडवून दाखवू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadanvis) यांनी दिली. महिला केंद्रित योजना सातत्याने राज्य सरकार सुरू करत आहे. भारताला गरिबीतून मुक्त करायचे असेल, विकसित भारताची निर्मिती करायची असेल तर महिलांना सक्षम करावे लागेल. अर्थसंकल्पात पाच वर्षांच्या पैशाची तरतूद करता आली असती तर आम्ही ती देखील केली असती. असे देखील देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadanvis) यांनी म्हटले आहे. (Mukhyamantri ladki Bahin Yojana)

महिलांना मानव संसाधनांमध्ये परावर्तित करावे लागेल. महिलांच्या माध्यमातून अर्थव्यवस्था संचालित करावी लागेल. तरच विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटले आहे. त्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात केली आहे. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महिला केंद्रित धोरणाची सुरुवात आम्ही राज्यात केली असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

(हेही वाचा – दिव्यांग हक्क सल्लागार मंडळामध्ये सदस्यांची निवडच नाही; Mumbai High Court ने सरकारला फटकारले)

काही सावत्र भाऊ देखील आहेत. ते सावत्र भाऊ तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. आधी या सावत्र भावांनी न्यायालयात जाऊन ही योजना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायालयाने ही योजना थांबवणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करून पाहिले. मात्र, ज्याच्या मागे ताई त्याला कोणी थांबवू शकत नाही. त्यामुळेच या सावत्र भावाने कितीही प्रयत्न केला तरीही योजना थांबवू शकले नाही. त्यामुळे एक कोटी पेक्षा जास्त महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये पोहोचले असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. लवकरच आणखी एक कोटी महिलांच्या खात्यात हे पैसे पोहोचतील, आम्ही कोणत्याच बहिणीला वंचित राहू देणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadanvis) यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – Mumbai – Nashik Highway वर वाहतूक कोंडी; नियम तोडणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाईची गरज)

मात्र हे केवळ निवडणुकीपुरते असल्याचा आरोप विरोधक म्हणजेच सावत्र भाऊ करत होते. मात्र आम्ही त्यांना आता थेट अर्थसंकल्प दाखवला असून या माता बहिणीच्या आशीर्वादाने पुढचे बजेट देखील आम्हीच मांडणार आहोत. त्यात पुढच्या वर्षाचे पैसे देखील आम्ही ठेवणार असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

हेही पाहा –

https://youtu.be/klsWVwD1XJ0?si=cRQMe05NeSfAgrCP

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.