मुलायम सिंह यादव यांची धाकटी सून अपर्णा यादव यांनी आज, बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीमधील भाजपा कार्यालयात उत्तर प्रदेशचे भाजपा प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. अपर्णा यादव या मुलायम सिंह यादव यांची दुसरी पत्नी साधना यादव यांचा मुलगा प्रतीक यादव यांच्या पत्नी आहेत. निवडणुकी आधीच यादव घराण्यातील सुनेने भाजपात प्रवेश केल्याने उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
Former Uttar Pradesh Chief Minister Mulayam Singh Yadav's daughter-in-law joins BJP #UttarPradeshElections2022 pic.twitter.com/ZEkd9wD2LV
— ANI (@ANI) January 19, 2022
समाजवादी पार्टी सोडल्याने राजकीय वर्तुळात चर्चा
अपर्णा यादव यांनी 2017 मध्ये समाजवादी पक्षाच्या तिकीटावर लखनऊ कँटमधून निवडणूक लढवली होती. त्यावेळी रिता बहुगुणी-जोशी यांनी त्यांचा पराभव केला होता. अपर्णा यादव वी-अवेअर नावाची संस्था चालवतात. ही संस्था महिलांसाठी तसेच गायींना निवारा देण्याचे काम करते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासकामांचं कौतुक केल्याने गेल्या काही दिवसांपासून त्या चर्चेत होत्या. लखनऊ कँट येथील जागेवरून निराश झाल्याने अपर्णा यांनी समाजवादी पार्टी सोडल्याची चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात आहे.
(हेही वाचा- महापालिकेचे अपयश धुण्यासाठी राज्य सरकारचा असाही पुढाकार)
देशाची सेवा करण्यासाठी भाजपात प्रवेश
पक्षात प्रवेश केल्यानंतर अपर्णा यादव यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या की, मी भाजपची खूप आभारी आहे. माझ्यासाठी देश नेहमीच प्रथम येतो. पंतप्रधान मोदी याचं कौतुक करताना अपर्णा यादव म्हणाल्या की, मी नेहमीच पंतप्रधानांच्या कामाची प्रशंसक राहिली आहे. मी देशाची सेवा करण्यासाठी भाजपात जात आहे. भाजपच्या योजना मला खूप प्रभावित करतात. देशासाठी मी जे काही करेन ते पूर्ण क्षमतेनं करेन अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
Join Our WhatsApp Community