Mumbai 26/11 attacks : मुंबई हल्ल्यातील दहशतवादी तहव्वूर राणाला भारताकडे सोपवणार; ट्रम्प यांची घोषणा

99
Mumbai 26/11 attacks : मुंबई हल्ल्यातील दहशतवादी तहव्वूर राणाला भारताकडे सोपवणार; ट्रम्प यांची घोषणा
Mumbai 26/11 attacks : मुंबई हल्ल्यातील दहशतवादी तहव्वूर राणाला भारताकडे सोपवणार; ट्रम्प यांची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या अमेरिका दौऱ्यावर (US Visit) आहेत. या दौऱ्यात त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोघांनी नियोजित कार्यक्रमानुसार संयुक्त पत्रकार परिषददेखील घेतली. या पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा केली. (Mumbai 26/11 attacks)

हेही वाचा-PM Narendra Modi २४ फेब्रुवारीला आसाम दौऱ्यावर

दरम्यान, मुंबईतील २००८ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपीचं प्रत्यार्पण करण्याची मंजुरी ट्रम्प प्रशासनाने दिली आहे. मोदी-ट्रम्प भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या कटातील सूत्रधार तहव्वुर राणा (Tahavur Rana) याच्या प्रत्यार्पणाला आम्ही मंजुरी देत आहोत. राणाला न्यायाचा सामना करण्यासाठी भारतात जावं लागेल असं त्यांनी सांगितले. (Mumbai 26/11 attacks)

व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. आम्ही इथं आणि भारतात बराच वेळ एकत्र राहिलो आहे. ५ वर्षापूर्वी मी सुंदर देशात जाऊन आलो. तो माझ्यासाठी अविश्वसनीय काळ होता. अमेरिका आणि भारत यांच्यात विशेष नातं आहे. जगातील सर्वात जुनी आणि मोठी लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी फ्रेमवर्कची मी घोषणा करत आहे असं त्यांनी सांगितले. (Mumbai 26/11 attacks)

अमेरिकन NSA माइकल वाल्ट्ज यांची भेट
पंतप्रधान मोदींची अमेरिकन NSA माइकल वाल्ट्ज (Michael Waltz) यांनी ब्लेयर हाऊसमध्ये भेट घेतली. या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून वाल्टज यांच्यासोबतची बैठक यशस्वी झाल्याची महिती दिली. माइकल वाल्ट्ज हे कायम भारताचे चांगले मित्र राहिल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले. माइकल वाल्ट्ज हे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. (Mumbai 26/11 attacks)

पंतप्रधानांची अमेरिकन NSA माइकल वाल्ट्ज यांनी ब्लेयर हाऊसमध्ये भेट घेतली. या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून वाल्टज यांच्यासोबतची बैठक यशस्वी झाल्याची महिती दिली. माइकल वाल्ट्ज हे कायम भारताचे चांगले मित्र राहिल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले. (Mumbai 26/11 attacks)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.