मुंबै बँकेवर कालपर्यंत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे वर्चस्व होते, मात्र बँकेच्या निवडणुकीत दरेकरांच्या हातून बँकेचा कारभार सेना-राष्ट्रवादीने ताब्यात घेतला आहे. या निवडणुकीकडे शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि सचिव मिलिंद नार्वेकर यांनी या निवडणुकीवर नियंत्रण ठेवले होते.
बँकेच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे
या निवडणुकीत प्रवीण दरेकर याना जोरदार धक्का बसला आहे. या निवडणुकीत दरेकरांना बँकेच्या अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागणार आहे. बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आणि त्यांनी दरेकर यांना अध्यक्षपदावरुन बाजूला केले. तर बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांनी विजय मिळवला. म्हणून भाजप आणि दरेकरांसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. या घडामोडीत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची मोठी खेळी असल्याचे सांगितले जात आहे.
सेना – राष्ट्रवादीने संगनमताने केला गेम
निवडणुकीपूर्वी सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मुंबई बँकेतील प्रतिनिधींची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. या बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर दोन्ही पक्षातील नेत्यांनी मिळून मुंबई बँकेवरील भाजपच्या वर्चस्वाला धक्का देत सत्ता परिवर्तन करण्याची रणनिती आखली. त्यानुसार अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर यांची उमेदवार जाहीर करण्यात आली. तसेच शिवसेना आमदार सुनिल राऊत आणि शिल्पा सरपोतदार यांच्यावर महत्वाची जबाबदारी दिली जाणार आहे.
Join Our WhatsApp Community