आता आशिष शेलारांना जीवे मारण्याची धमकी…

कालपर्यंत सत्ताधारी पक्षातील मंत्री आणि आमदार हे त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळत आहे, अशी तक्रार करत होते, मात्र आता भाजपचे नेते, आमदार  अॅड. आशिष शेलार यांनी त्यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, असे म्हणाले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकारण ढवळून निघाले आहे.

यापूर्वीही शेलार यांना देण्यात आलेली धमकी

भाजप नेते अॅड. आशिष शेलार यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी शेलार यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार दिली. यापूर्वीही अशाच प्रकारे शेलार यांना धमकी देण्यात आली होती. त्यात पोलिसांनी आरोपीला मुंब्रा येथून अटक केली होती. भाजपचे नेते आशिष शेलार यांना यावेळी फोनवरून धमकी देण्यात आली आहे. शेलार यांना अज्ञात व्यक्तीचे दोन वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून फोन आले. शेलार आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच अर्वाच्च भाषा वापरली. या प्रकारानंतर शेलार यांनी तातडीने मुंबई पोलिस आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार दिली आहे. शेलार आणि कुटुंबियांना एका अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ज्या मोबाइल क्रमांकांवरून धमकी देण्यात आली होती, त्या दोन्ही क्रमांकांची माहिती देऊन याचा तपास करावा, अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

(हेही वाचा मध्य रेल्वेच्या ‘या’ एक्सप्रेस गाड्या रद्द! कारण जाणून घ्या…)

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कळवले

यापूर्वी शेलार आणि अन्य दोन व्यक्तींची रेकी केल्याचे समोर आले होते. आता दहशतवाद्यांकडून नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची रेकी करण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्याच दरम्यान आशिष शेलार यांना धमकीचे फोन येत आहेत, ही गंभीर बाब असल्याचे सांगण्यात आले. याबाबत शनिवारी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही पत्राद्वारे या प्रकाराची माहिती देण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here