चेंबूरमध्ये भाजपाच्या पोलखोल सभेच्या रथाची तोडफोड!

144

महाविकास आघाडी सरकरच्या वसुलीखोरीची आणि गेल्या 25 वर्षात मुंबई महानगर पालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी पत्रा चाळ असलेल्या वाॅर्डमधून भाजपाने हे पोलखोल आंदोलन सुरु केले. चेंबूरमध्ये विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्या उपस्थितीतमध्ये पोलखोल अभियानाच्या रथाचे उद्धाटन केले जाणार आहे आणि या उद्घाटनापूर्वी मात्र महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप भाजपाकडून केला जात आहे.

दगड मारणा-यांचा शोध सुरु

सोमवारी रात्री जी डी गिडवणीमार्ग या ठिकाणी असलेल्या भाजपच्या कार्यालयाजवळ एका मोटारीचा रथ तयार करून त्याला विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते. या रथाच्या सुरक्षेसाठी रथाजवळ रात्रभर कुठलेही कार्यकर्ते अथवा सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले नव्हते, याचा फायदा घेत अज्ञात समाज कंटकांनी या रथावर दगड मारून रथाची काच तोडली असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. मंगळवारी सकाळी हा प्रकार लक्षात येताच या घटनेची दखल घेण्यात आलेली असून सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत. दगड मारणाऱ्याचा शोध घेतला जात आहे. प्रवीण दरेकर यांचा कार्यक्रम सुरू झाला असून, पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे.

म्हणून भाजपाकडून या अभियानाची सुरुवात 

रात्री 1 नंतर या भाजपच्या पोलखोल रथाच्या गाडीची तोडफोड करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ड्रायव्हर समोरील काचच फोडण्यात आली आहे. पण नेमका हा प्रकार कोणी केला हे मात्र समजू शकलेले नाही. चेंबूरमधील भाजप नगरसेवकांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले असल्याचा संशय व्यक्त केला आहे. महाविकास आघाडी सरकारची मुंबईतील कामांची पोलखोल करण्यासाठी भाजपने हे अभियान राबवले आहे. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, अतुल भातखळकर यांच्या हस्ते यांचे उद्घाटन होणर आहे. त्यापूर्वीच भलामोठा दगड मारत या रथाची तोडफोड करण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.