‘महापौर पेडणेकरांसह कुटुंबाला ठार मारणार’

139

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. या पत्रात त्यांना जीवे मारण्याची तसेच, कुटुंबियांना संपवण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे आता महापौर किशोरी पेडणेकर यांनी भायखळा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. तसेच संरक्षण देण्याची मागणी महापौरांनी केली आहे.

मी शिवसेनेची कार्यकर्ता आहे 

महापौरांना जी पत्रे येतात, त्यात हे देखील पत्र होतं. या पत्रात आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पत्राच्या वर दुसरे नाव आहे आणि आतमध्ये वेगळे नाव असल्याचे सांगितले जात आहे. पत्रामध्ये शिवीगाळ केली आहे, तसेच कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली  असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर  यांनी सांगितले. माझा आवाज दाबण्याचा कुणी प्रयत्न करत असेल, पण मी शिवसेनेची कार्यकर्ता आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

संरक्षण देण्याची मागणी 

हे पत्र नेमकं कुठून आलं, ते कुणी पाठवलं याबाबत काही माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, महापौर पेडणेकर या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असून, कुटुंबीयांसाठी संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

 ( हेही वाचा :आता भारताचे हरित विकासाकडे लक्ष! काय म्हणाल्या केंद्रीय वित्त मंत्री? )

अतुल भातखळकरांची प्रतिक्रिया

या पत्राचा संबंध महापौरांनी भाजपशी जोडला नाही. तातडीने महापौरांना सुरक्षा दिली पाहिजे. राज्य सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे. मुंबईच्या प्रथम नागरिक किशोरी पेडणेकर यांना आलेल्या धमकीची दखल घेऊन तातडीने कारवाई केली पाहिजे, असे अतुल भातखळकर म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.