मुंबईच्या नेहरुनगर परिसरात इमारत सोमवारी रात्री 11:30 कोसळली. या इमारत दुर्घटनेत सरकारकडून अद्याप कोणतीही आर्थिक मदत जाहीर झालेली नाही. पण त्याआधी थेट गुवाहाटीमधून एकनाथ शिंदेंच्या सुचनेनुसार, स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांनी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. इमारत दुर्घटनेत जखमी झालेल्यांना 1 लाख, तर मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
इमारत पत्त्यासारखी कोसळली
सोमवारी मध्यरात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ही धोकादायक इमारत होती. तरीही या इमारतीत कुटुंबं वास्तव्यास होती. या इमारतीत राहत असलेली लोकं सोमवारी रात्री झोपेत असताना, ही इमारत पत्त्यासारखी कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला असून, 10 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, मदत व बचाव कार्य सुरु आहे.
( हेही वाचा: वारीसाठी कोणत्या उपाययोजना आखल्या; न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा )
Join Our WhatsApp Communityदुःखद घटना
नाईक नगर, कुर्ला (पू) येथे चार मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली. अग्निशामक , महानगरपालिका , पोलिस यंत्रणा बचाव कार्य सुरू आहे.
कुटुंबियांना 1 लाख व मृत व्यक्तींना 5 लाख मा मंत्री एकनाथ शिंदे , आमदार मंगेश कुडाळकर यांच्या तर्फे करण्यात येईल @mieknathshinde pic.twitter.com/dqLciAzmIW— Mangesh Kudalkar – मंगेश कुडाळकर (@mlamangesh) June 28, 2022