अनिल देशमुखांचा CBI कोठडीतील मुक्काम वाढला, न्यायालयाने नाकारला जामीन

182

मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे निर्देश दिल्यानंतर सुरू झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मुंबई न्यायालयाने फेटाळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दाखल केलेला जामीन अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे देशमुखांचा सीबीआय कोठडीतला मुक्काम वाढला आहे. अनिल देशमुख यांच्यासह त्यांचे सहकारी कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे देशमुखांना हा मोठा धक्का मानला जात असून त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

(हेही वाचा – विजय माल्याला ‘या’ प्रकणात २ हजारांच्या दंडासह ४ महिने तुरूंगवास!)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचाराचे आरोप आहे. या आरोपानंतर ईडीने देशमुखांना अटक केली होती. त्यानंतर सीबीआयनेही कारागृहात जाऊन देशमुखांची गैरव्यवहाराप्रकरणी चौकशी केली होती. तसेच, दरमहा १०० कोटींच्या कथित खंडणी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार सीबीआयने गुन्हा नोंदवत या प्रकरणी तपास सुरू केला होता. त्यानंतर ईडीने याच एफआयआरमध्ये अनिल देशमुखांसह काही जणांना अटक केली होती. त्यामुळे आजही देशमुख तुरूंगातच आहेत.

अनिल देशमुख आणि त्यांचे सहकारी स्वीय सचिव संजीव पालांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांच्यावर सीबीआयने आरोपपत्र दाखल केले असून बडतर्फ पोलीस अधिक्षक सचिन वाझेला माफीचा साक्षीदार करण्यात आले आहे. त्याप्रकरणात देशमुखांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, अद्याप न्यायालयाने देशमुखांना दिलासा दिलेला नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.