मलिकांकडून मोहित भारतींची बदनामी! न्यायालयाचा प्राथमिक निष्कर्ष 

133

एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे आणि त्यांचे कुटुंबीय यांची बदनामी केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात माफी मागायला लागल्यावर त्यांना आता भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कुंभोज यांची बदनामी केल्याचे प्रकरण भोवणार आहे. माझगाव न्यायालयानेही मलिकांकडून मोहित कुंभोज उर्फ मोहित भारती यांची बदनामी केल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे, असे म्हटले.

मलिकांविरोधात फौजदारी कारवाईची मागणी 

७ नोव्हेंबर २०२१ या दिवशी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेतून माझी आणि माझ्या मेव्हण्याची बदनामी केली. त्यामुळे मलिक यांच्याविरोधात कलम १९०, ४९९ आणि ५०० अंतर्गत फौजदारी खटला चालवण्यात यावा, या मागणीसाठी भारती यांनी माझगाव न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली असता न्यायालयाने या प्रकरणात मलिक यांच्याकडून भारती यांची बदनामी झाल्याचे प्राथमिकदृष्टया दिसत आहे. त्यामुळे न्यायालयाने त्यांना नोटीस बजावली.

(हेही वाचा न्यायालयाने खडसावल्यावर मलिकांना उपरती, वानखेडेंची मागितली माफी)

वानखेडेंची मागितली माफी

एनसीबीचे विभागप्रमुख समीर वानखेडे यांची आणि त्यांच्या कुटुंबाची बदनामी एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सोशल मीडियातून केली. त्याविरोधात समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणीही नवाब मलिक यांनी वानखेडे यांची न्यायालयात हमी देऊनही बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी माफी मागितली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.