न्यायालय म्हणते, ‘होय ममता बॅनर्जींनी राष्ट्रगीताचा अवमान केलाय’

149

मागच्या महिन्यात मुंबईतील एका सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रगीताचा अनादर केल्याच्या आरोपावरून भाजपचे सदस्य आणि वकिल विवेकानंद गुप्ता यांनी दाखल केलेल्या, तक्रारीवरून मुंबईतील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने मंगळवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना समन्स बजावले आहेत. या समन्सला उत्तर देण्यासाठी ममता बॅनर्जी यांना 2 मार्च पर्यंतचा वेळ न्यायालयाने दिला आहे.

ममता बॅनर्जी दोषी

या याचिकेनुसार, डिव्हीडीमधील व्हिडिओ क्लिप आणि युट्युब लिंकवरील व्हिडिओनुसार असे दिसून येतं की, ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीत गायला सुरुवात केली, तसेच ते मधेच थांबवले आणि सभेचा त्याग केला. त्यामुळे प्रथमदर्शनी ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा 1971 च्या कलम 3 अंतर्गत दंडनीय कृत्य केले आहे, असं न्यायालयाने मंगळवारी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

विवेकानंद गुप्ता यांनी केलेल्या तक्रारीत दावा केला गेला आहे की, कार्यक्रमाच्या शेवटी ममता बॅनर्जी या बसूनच राष्ट्रगीत म्हणू लागल्या. त्यानंतर त्या उभ्या राहिल्या आणि पुढच्या दोन ओळींनंतर त्यांनी राष्ट्रगीत अचानक थांबवलं आणि डेस्क सोडून निघून गेल्या. त्यामुळे विवेकानंद यांनी हा राष्ट्रगीताचा अपमान असल्याचं सांगत, राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी करत, न्यायालयात याचिका दाखल केली.

(हेही वाचा: जबरदस्तीच्या धर्मांतराविरोधात अजूनही संघर्ष करतायत अनेक ‘लावण्या’ )

2 मार्च पर्यंतची मुदत

न्यायालयानुसार, हा कार्यक्रम सरकारी नसल्याने ममता बॅनर्जींवर खटला चालवला जाऊ शकत नाही. तसेच, ममता बॅनर्जी यांच्या विरोधात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या तरतुदींनुसार कारवाई करण्यासाठी सध्या न्यायालयाकडे असणारे पुरावे पुरेसे आहेत. न्यायालयाने बजावलेल्या समन्सला उत्तर देण्यासाठी ममता बॅनर्जी यांना 2 मार्च पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

दोषी आढळल्यास ‘ही’ शिक्षा 

कायद्याच्या कलम 3 नुसार, राष्ट्रगीत गाणा-या कोणत्याही सभेला मधेच थांबवणे तसेच अडथळा निर्माण करणे हा राष्ट्राचा अपमान आहे आणि त्याअंतर्गत दोषी आढळल्यास, आरोपीला 3 वर्षांचा कारावास तसेच दंड या दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.