वाझेचे ‘नंबर १’ कोण? परमबीर की देशमुख?

ईडीसह मुंबई गुन्हे शाखा या दोन्ही तपास यंत्रणा बुचकळ्यात

116

पोलीस दलात पुन्हा रुजू झाल्यानंतर वाझेने मुंबईतील बार वाल्याकडून मोठी वसुली सुरू केली होती. ही वसुली एक नंबरच्या सांगण्यावरून करीत असल्याचे वाझेने म्हटले होते, मात्र त्याचा नंबर वन बॉस नक्की कोण आहे? याचे कोडे मुंबई गुन्हे शाखेसह ईडीला देखील पडले आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्हयात ‘एक नंबर बॉस’चा उल्लेख असल्यामुळे हा एक नंबर म्हणजे परमबीर सिंग असल्याचा संशय मुंबई गुन्हे शाखेला आहे तर ईडीला वाझेने दिलेल्या जबाबात एक नंबर बॉस म्हणजे अनिल देशमुख असल्याचा संशय ईडीला आहे. या दोन्ही यंत्रणांना पडलेले हे कोडं सचिन वाझेच सोडवू शकतो नक्की कुणाच्या सांगण्यावरून मुंबईतील बार मधून वसुली होत होती.

असे म्हटले रिमांड कॉपीमध्ये…

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सोमवारी रात्री उशिरा सक्तवसुली संचनालनाय (ईडीने) मनी लॉन्डरिंगच्या गुन्हयात अटक केली आहे. मंगळवारी देशमुख यांना पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. देशमुख यांना न्यायालयाने ६ नोव्हेंबरपर्यत ईडी कोठडी सुनावली आहे. या दरम्यान ईडीने न्यायालयात दाखल केलेल्या रिमांड कॉपीमध्ये अनिल देशमुखांवर लावण्यात आलेल्या आरोपासह वाझे याचा तुरुंगात जाऊन घेतलेल्या जबाबाचा उल्लेख ईडीने रिमांड कॉपीत केला आहे. अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना वाझेला मुंबईतील प्रत्येकी बार मधून ३ लाख रुपयांची वसुलीचे महिन्याला टार्गेट दिले होते, असे वाझे याने म्हटले असल्याचे ईडीने म्हटले आहे. त्यात अनिल देशमुख यांचा उल्लेख त्याने ‘नंबर वन बॉस’ केला असल्याचे रिमांड कॉपीमध्ये ईडीने म्हटले आहे.

(हेही वाचा – अनिल देशमुखच ‘नंबर १’! काय म्हटले ईडीने न्यायालयात?)

दोन्ही तपास यंत्रणा बुचकळ्यात

परंतु गोरेगाव पोलीस ठाण्यात एका हॉटेल व्यवसायिकाच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्हयात सचिन वाझे, परमबीर सिंग यांच्यासह सहा जण आरोपी आहे. सचिन वाझे हा तक्रारदाराला सतत नंबर वन बॉस ने बोला है, असा सारखा उल्लेख करीत होता. तो नंबर वन बॉस म्हणजे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग असल्याचा संशय गुन्हे शाखेला असून नंबर वनचे कोडं सोडवण्यासाठी सचिन वाझेचा मुंबई गुन्हे शाखने तळोजा तुरुंगातून सोमवारी ताबा घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे. हा नंबर वन नक्की कोण आहे ? या वरून दोन्ही तपास यंत्रणा बुचकळ्यात पडली असून वाझे हाच सांगू शकतो की, नंबर वन कोण आहे. नंबर वन कोण परमबीर सिंग की अनिल देशमुख ? हे जाणून घेण्यासाठी ईडी सचिन वाझेकडे पुन्हा चौकशी करू शकते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.