शिवसेनेचे खासदार नेते संजय राऊत यांनी टार्गेट केलेल्या जितेंद्र नवलानी यांना मुंबई गुन्हे शाखेने समन्स पाठवल्याची चर्चा आहे. संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत जितेंद्र नवलानी हे ईडीच्या अधिकऱ्यांसाठी खंडणी गोळा करण्याचे काम करत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी त्यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. आता या प्रकरणाच्या तपासाकरिता जितेंद्र नवलानी यांना मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या समन्स पाठवले आहे.
या तक्रारीची दखल घेत समन्स
संजय राऊत यांनी यासंदर्भातील पुरावे आपण आर्थिक गुन्हे शाखेकडे देणार असल्याचे सांगितले होते. या तक्रारीची दखल घेत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जितेंद्र नवलानींविरुद्ध प्राथमिक चौकशीला सुरुवात केली आहे. त्यामुळे या तक्रारीची दखल घेत आर्थिक गुन्हे शाखेने नवलानी यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
कोण आहेत जितेंद्र नवलानी?
जितेंद्र नवलानी आणि संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स आर्थिक गुन्हे शाखेने बजावले आहे. संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत आरोप करताना जितेंद्र नवलानी हे खंडणीचे रॅकेट चालवत असून त्यांचा मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यातही सहभाग असल्याचा आरोप केला होता. संजय राऊत यांनी अरविंद भोसले नावाच्या एका व्यक्तीने केलेली तक्रार मुंबई पोलीस आयुक्तांना दिली होती. ज्यात जितेंद्र नवलानीच्या नावाने नोंदणी असलेल्या कंपन्यांमध्ये २०१५ ते २०२० या काळात जवळपास ७० फर्म्सनी ५९ कोटी रुपये जमा केल्याचे म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community