भाजपाचे नेते नितेश राणे य़ांनी आदित्य ठाकरेंना डिवचले. वरळीमध्ये भारतीय जनता पक्षाला आव्हान देण्याची हिंमत कोणी करू नये. विधानसभेत साधे मी म्याव म्याव आवाज काढल्यावर काय अवस्था झालेली ही संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. म्हणून उगाच डरकाळी मारण्याचा प्रयत्न कोणी करू नये. मुंबई काय कोणाच्या साहेबांची नाही पण मुंबई तुमच्यासारख्या असंख्य मुंबईकरांची आहे हे लक्षात ठेवावे, असे म्हणत भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. दहीहंडी कार्यक्रमात ते बोलत होते.
सगळ्यांना हा क्षण साजरा करू द्या!
आज सगळीकडे उत्साह चांगला आहे. लहानपणापासून आम्ही हंडी बघतोय. आज सुरक्षित गोविंदा साजरा होत आहे. गेली २ वर्ष कोविड काळात गेले. यंदा लोक उत्साहात बाहेर पडले आहेत. अनेक ठिकाणी मी जातो आहे. दहीहंडी सगळीकडे साजरी होते. आजच्या दिवशी मला पोरकट राजकारणात जायचे नाही. आनंदाचा क्षण साजरा करायला. सगळ्यांना हा क्षण साजरा करू द्या असे म्हटले आहे. वरळी मतदारसंघात दरवर्षी जांबोरी मैदानात सचिन अहिर यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहिकाला उत्सव साजरा केला जातो. परंतु यंदा जांबोरीच्या याच मैदानात भाजपाने दहीहंडी उत्सव आयोजित केला आहे. भाजपाने जांबोरी मैदान घेतले त्यावरून शिवसेनेवर टीका होऊ लागली. ३ आमदार, १ खासदार, स्थानिक लोकप्रतिनिधी असूनही शिवसेनेला जांबोरी मैदान मिळाले नाही, अशी टीका भाजपाकडून होऊ लागली.
(हेही वाचा दादर स्थानकाबाहेर शक्तीप्रदर्शन करण्यात शिवसेना रंगली, तिकडे शाखेबाहेरच भाजपने बांधली हंडी)
Join Our WhatsApp Community