Mumbai Election Campaign : मुंबईत प्रचाराचा धूमधडाका आठवडा

लोकसभा २०२४ निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान आठवड्यावर आले असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे ‘लक्ष्य’ आता मुंबई असणार आहे.

140
Mumbai Election Campaign : मुंबईत प्रचाराचा धूमधडाका आठवडा
  • सुजित महामुलकर

लोकसभा २०२४ निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान आठवड्यावर आले असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे ‘लक्ष्य’ आता मुंबई असणार आहे. उद्या रविवारपासूनच मुंबईतील प्रचाराला खऱ्या अर्थाने वेग येऊन पूर्ण आठवडा धूमधडाका सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पुढच्या शनिवारी १८ मे ला संध्याकाळी या प्रचाराच्या तोफा थंडावतील. (Mumbai Election Campaign)

महायुतीकडून ‘दम’दार नेत्यांना मागणी

महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपाचे देवेंद्र फडणवीस, मनसेकडून राज ठाकरे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘दम’दार नेते अजित पवार यांच्या सभांना मुंबईतील सर्वच उमेदवारांकडून मागणी असून कुणाची तोफ कुठे धडाडणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. शुक्रवारी तर महायुतीची मेगा-मॅरथॉन सांगता सभा होणार असून या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसेचे प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. (Mumbai Election Campaign)

शिवसेना उबाठाचे ‘मन’सूबे उधळले

महाविकास आघाडीकडूनही शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी कंबर कसली असून मुंबईतील सभांची चाचपणी घेण्याचे काम सुरू केले आहे. शिवसेना उबाठाकडून छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्याचे नियोजन मनसेकडून उधळून लावण्यात आले. मनसेने आधीच छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर १७ मे च्या जाहीर सभेसाठी महापालिकेकडे परवानगी मागितल्याने उबाठाचे मनसुबे उधळले गेले. आता महाविकास आघाडी पर्यायी जागेच्या शोधत असल्याचे सांगण्यात आले. (Mumbai Election Campaign)

राणा-केजरिवाल ‘स्पेशल आपियरन्स’

या नेत्यांव्यतिरिक्त महायुतीकडून भाजपाचा आणखी एक स्टार प्रचारक उदयाला याला असून अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा आणि महाविकास आघाडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांच्या ‘स्पेशल आपियरन्स’ सभा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Mumbai Election Campaign)

(हेही वाचा – मुंबईकरांसाठी अपडेट : लोकलच्या तिन्हीं मार्गावर असणार ‘Megablock’)

वडेट्टीवार यांच्याकडून निकामांचा प्रचार

मुंबईतील उशिरा जाहीर झालेल्या उत्तर-मध्य मुंबई मतदार संघाने प्रचाराचा ‘बॅक-लॉग’ जवळपास भरून काढला आणि त्याला साथ दिली ती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी. उत्तर मध्य मुंबई मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार, जेष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्यावर वडेट्टीवार यांनी बेताल आरोप केले. ‘मुंबईवरील दहशतवादी हल्ला झाला त्यात आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्यावर गोली झाडण्यात आली ती दहाशतवादयाच्या बंदुकीतील नव्हती तर आरएसएस विचारधारेच्या एका पोलिस अधिकाऱ्याची बंदुकीची होती आणि ही माहिती निकम यांनी न्यायालयात लपवली’ असा निरर्थक आरोप काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी करून निकम यांच्या प्रसिध्दीत भर टाकली. (Mumbai Election Campaign)

‘उत्तर-पश्चिम’ही गाजणार

अशाच प्रकारे मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांची कोविड घोटाळ्याची ‘कीर्ती’ सर्वश्रुत आहे. १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी इक्बाल मुसा याने कीर्तिकर यांच्या प्रचारात सहभागी झाल्याच्या आरोपाने आणखी भर टाकली. नवनीत राणा यांनी हैदराबादला ‘एमआयएम’च्या बालेकिल्ल्यात जाऊन असदुद्दीन ओवैसी यांनाच आव्हान दिले. त्यामुळे राणा या आता मुंबईत येऊन काय बोलणार, याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. (Mumbai Election Campaign)

चौथ्या टप्प्याचा प्रचार संपला

राज्यात चौथ्या टप्प्याचे मतदान सोमवारी १३ मे रोजी अकरा मतदार संघात होणार असून आज ११ मे ला संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आणि सर्वच नेत्यांना आता मुंबईचे वेध लागले आहेत. पुढच्या शनिवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईचा प्रचार थांबेल. (Mumbai Election Campaign)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.