Mumbai Goa Highway: गणपती पाटावर बसण्याआधी मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करा; नारायण राणेंची गडकरींकडे मागणी

89
Mumbai Goa Highway: गणपती पाटावर बसण्याआधी मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करा; नारायण राणेंची गडकरींकडे मागणी
Mumbai Goa Highway: गणपती पाटावर बसण्याआधी मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करा; नारायण राणेंची गडकरींकडे मागणी

खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे (Mumbai Goa Highway) राहिलेले काम गणपतीपर्यंत पूर्ण व्हावे, अशी मागणी नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली. तसेच पत्रादेवी ते राजापूर भागाचे सुशोभीकरण पूर्ण व्हावे, अशी विनंतीही त्यांनी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे केली. (Mumbai Goa Highway)

मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण व्हावे

नारायण राणे यांनी खासदार झाल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai Goa Highway) चौपदरीकरणाच्या रखडलेल्या कामात लक्ष घातले आहे. यंदा 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थी (Ganpati Utsav 2024) आहे. याच दिवशी कोकणातील घराघरांमध्ये लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. त्यापूर्वी मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरातून लाखो चाकरमनी हे कोकणात जातात. त्यापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण व्हावे, अशी मागणी नारायण राणे यांनी गडकरी यांच्याकडे केली.

कोकणचा विकास करण्याचा शब्द मतदारांना दिला होता

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांचा पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी नारायण राणे यांनी कोकणचा विकास करण्याचा शब्द मतदारांना दिला होता. त्यानुसार आता नारायण राणे हे कामाला लागले असून त्यांनी सर्वप्रथम मुंबई-गोवा महामार्गाच्या मुद्द्याला हात घातल्याचे दिसत आहे. (Mumbai Goa Highway)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.