BMC : मुंबईचे पालकमंत्री पालिका मुख्यालयात कार्यालय थाटण्यास अनुत्सूक

मंगलप्रभात लोढा यांचा भाजपच्या वतीने सर्वसामान्यांच्या तक्रारी जाणून घेत त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न

213
BMC : मुंबईचे पालकमंत्री पालिका मुख्यालयात कार्यालय थाटण्यास अनुत्सूक
BMC : मुंबईचे पालकमंत्री पालिका मुख्यालयात कार्यालय थाटण्यास अनुत्सूक

मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना महापालिकेत नागरीक तक्रार निवारण कार्यालय उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर आता शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासाठीही दालन देण्याची पूर्ण तयारी प्रशासनाने ठेवली आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी शहराच्या पालकमंत्र्यांनी अशा प्रकारचे दालन मागितल्यास त्यांनाही दिले जाईल, असे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. लोढा यांना कार्यालय उपलब्ध करून दिल्यानंतर एक महिन्याचा कालावधी उलटत आला, तरी राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाचे आमदार आणि शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना मात्र महापालिका मुख्यालयात दालन घेण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे पालकमंत्री दीपक केसरकर यांची इच्छा नाही की मुंबईत शिवसेनेला महापालिकेतील प्रश्न सोडवण्याची इच्छा नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कौशल्य, रोजगार मंत्री आणि उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मागील ६ जून २०२३ राेजी महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांना पत्र पाठवून नागरी समस्या निवारणासंदर्भात नागरिक कक्षाची स्थापना करण्याच्या दृष्टीने महापालिका मुख्यालय इमारतीत कार्यालय उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्या दृष्टीकोनातून प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी लोढा यांच्या नागरिक कक्षाच्या स्थापनेसाठी जागेचा शोध घेत बाजार आणि उद्यान समिती अध्यक्षांचे दालन दिले आणि अभ्यागतांसाठी शिक्षण व बाजार उद्यान समितीच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या कार्यालयाची जागा उपलब्ध करून देण्यात आली. त्यानुसार २० जुलै २०२३ रोजी मंत्री लोढा यांना नागरी समस्या निवारणासंदर्भात नागरिक कक्षाचे दालन उपलब्ध करून देण्यात आले.

(हेही वाचा – Sanatan Sanstha : सनातनला दोषी ठरवणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या पदाधिकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करणार – सनातन संस्था)

त्यानुसार लोढा हे दर दिवशी संध्याकाळी या कक्षात बसून भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, तसेच नागरिकांकडून आलेल्या समस्या जाणून घेत पुढील कार्यवाहीसाठी प्रशासनाकडे लेखी स्वरूपातील तक्रारी पाठवल्या जातात. त्यामुळे मागील महिन्यापासून लोढा यांनी मंत्री म्हणून भाजपच्या वतीने सर्वसामान्यांच्या तक्रारी जाणून घेत त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

लोढा यांना दिलेल्या या दालनावरून विधीमंडळातही विरोधकांनी तीव्र टिका करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री लोढा यांनी कोणी काहीही बोलू द्या, मी तिथे जनतेची कामे करण्यासाठी बसलो आहे आणि मी पुढेही करत राहणार, असे सांगत विरोधकांची तोंडे गप्प केली. नगरसेवक नसल्याने भाजपने जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी मुख्यालयातच जागा उपलब्ध करून दिले. शिवसेनेला मात्र यासाठी मुख्यालयात कार्यालय खुले करून घेण्याची इच्छा दिसत नाही. शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आजही प्रशासनाकडे कोणत्याही प्रकारची इच्छा प्रकट केलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने त्यांना कार्यालय उपलब्ध करून दिले नसले, तरी भविष्यात जर त्यांनी जागेची मागणी केल्यास त्यांना शिक्षण समिती अध्यक्षांचे दालन दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री आणि प्रशासनात समन्वय राखण्यासाठी सहायक आयुक्त मृदुला अंडे यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नियुक्तीमध्येही उपनगर आणि शहर विभागाच्या दोन्ही पालकमंत्र्यांच्या कार्यालयाचे समन्वयक असा उल्लेख करण्यात आला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.