मागील काही महिन्यांपासून किरिट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांविरोधात, नेत्यांविरोधात सातत्याने आरोप केले, त्यामुळे सोमय्यांच्या या आरोपाविरोधात काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मुंबई उच्च न्यायालयालयाच्या नागपूर खंडपीठात मानहानीचा दावा दाखल केला होता. नागपूर खंडपीठानं तो दावा फेटाळून लावला आहे. न्यायालयानं दावा फेटाळल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन दिली आहे.
किरिट सोमय्यांचे ट्विट
आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत, भाजपा नेते किरिट सोमय्या यांनी “माझ्या विरुद्ध काँग्रेसचे अतुल लोंढे यांनी दाखल केलेला मानहानीचा खटला नागपूर न्यायालयाने फेटाळला” असं सांगितलं आहे.
Defamation case filed by Congress Atul Londhe against Me dismissed by Nagpur Court
माझ्या विरुद्ध काँग्रेसचे अतुल लोंढे यांनी दाखल केलेला मानहानीचा खटला नागपूर न्यायालयाने फेटाळला @BJP4India @BJP4Maharashtra pic.twitter.com/gPUY30Lrp5
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 18, 2022
काय आहे प्रकरण
किरिट सोमय्या हे वारंवार काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना नेत्यांच्याविरोधात गरळ ओकतात. बिनबुडाचे आरोप करतात तसेच, नाहक बदनामी करतात, असं सांगून काॅंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सोमय्या यांच्या विरोधात नागपूर कोर्टात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल केली होती. याचिका दाखल झाल्यानंतर अतुल लोंढे म्हणाले की, सतत खोट्या आरोपांची राळ उडवून, महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे काम सोमय्या करत आहेत. स्वतःच तपास अधिकारी व स्वतःच न्यायाधीश असल्याच्या आविर्भात ते विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सातत्याने खोटे आरोप करून, बदनामी करत आहेत, असे म्हणात लोंढे यांनी सोमय्या यांच्याविरोधात नागपूर जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती.
Join Our WhatsApp Community