गोविंद पानसरे हत्याकांडाचा तपास आता एटीएसकडे, उच्च न्यायालयाचा निर्णय

कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या बहुचर्चित हत्याप्रकरणाच्या तपासाबाबत बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे या हत्याकांडाचा तपास करणा-या विशेष एसआयटी पथकाकडून हा तपास आता दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच एटीएसकडे वर्ग करण्यात येणार आहे.

तपास एटीएसकडे

2015 रोजी कॉ. गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष एसआयटी पथक स्थापन करण्यात आले होते. पण तपासात काहीच हाती न आल्यामुळे आता उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास एटीएसकडे वर्ग करण्याचे निर्देश दिले आहेत. एसआयटी पथकातील काही अधिकारी या प्रकरणात आता एटीएसला सहाय्य करणार आहेत.

(हेही वाचाः राज्यपालांनी शिंदेंना का दिलं सत्तास्थापनेसाठी निमंत्रण? वकिलांनी केले स्पष्ट)

सात वर्ष होऊनही तपासात यश नाही

16 फेब्रुवारी 2015 मध्ये पानसरे यांची अज्ञात व्यक्तींकडून कोल्हापूर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.पानसरे यांच्या मारेक-यांचा तपास करण्यासाठी एसआयटी पथक स्थापन करण्यात आले होते. पण या पथकाकडून तपासात काहीही निष्पन्न झाल्यामुळे पानसरे यांच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सात वर्ष होऊनही या तपासात एसआयटीला यश आलेले नाही. त्यामुळे आता हा तपास एटीएसकडे सोपवण्यात आल्यामुळे पानसरे यांच्या मारेक-यांचा शोध लागेल अशी आम्हाला अपेक्षा असल्याचे पानसरे यांच्या कन्या मेघा पानसरे यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here