शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने मंजूर केला नव्हता. त्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. शिवसेना ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी उच्च न्यायालयाने महानगरपालिकेला उद्या ( शुक्रवारी) 11 वाजेपर्यंत राजीनामा घेण्याचे आदेश दिले आहेत.
( हेही वाचा अनिल परबांच्या साई रिसॉर्ट संदर्भात नवी अपडेट, सोमय्यांनी ट्वीट करून दिली माहिती )
उद्धव ठाकरे गटाच्यावतीने अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण त्या महापालिकेच्या सेवेत होत्या, त्यांनी 3 ऑक्टोबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता पण पालिकेने त्यांचा राजीनामा स्वीकरला नव्हता. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचे काय होणार हा प्रश्न निर्माण झाला होता.
ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर स्पष्टीकरण देताना पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी 30 दिवसांत हा राजीनामा स्वीकारला जाईल, असे स्पष्टीकरण दिले होते. त्यावर ऋतुजा लटके यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने ऋतुजा लटके यांच्या बाजूने निकाल देताना, त्यांचा राजीनामा उद्या ( शुक्रवारी) सकाळी 11 वाजेपर्यंत स्वीकारावा, असे निर्देश दिले आहेत.
Join Our WhatsApp Community