मुंबई आयआयटीला ‘जेएनयू’ची लागण; ‘जय श्रीराम’ म्हणण्यावर आक्षेप

127

मुंबई आयआयटी ही संस्था देशातच नव्हे तर जगात अग्रेसर शिक्षण संस्था आहे. या संस्थेतही आता जातीयवादी विचारांचा प्रसार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे जेएनयूची लागण आता इतरही शिक्षण संस्थांना लागत आहे का, अशी शंका येत आहे. कारण ट्विटरवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांची चौक सभा आयआयटी मुंबईच्या आवारात घेतली जात असून त्यामध्ये वक्त ब्राह्मण द्वेषी विचार मांडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे.

काय म्हटले आहे या व्हिडिओमध्ये? 

जोवर तुम्ही घरी जाऊन जय श्रीराम म्हणत असाल तोवर तुमची मानसिकता ब्राह्मणवादी असणार आहे. जोवर तुम्ही जय श्रीराम बोलणार तुम्हाला जय ब्रह्मा, जय क्षत्रिय, जय वैश्य बोलावेच लागणार. दलितांना कनिष्ठ संबोधित करावे लागणार. ब्राम्हणवादी मानसिकतेबाबत आपल्या सर्वांना विचार करावा लागणार आहे, असे वक्ता आयआयटीच्या विद्यार्थ्यांसमोर बोलत आहे.

(हेही वाचा महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील युक्तिवाद २ दिवसात पूर्ण करा, प्रकरण संपवायचे आहे; सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे निर्देश)

सोशल मीडियावर कारवाईची मागणी

धोतीराम झुले म्हणतात की, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्त्यावर कारवाई करावी अशी मागणी केली.

तर हृषीकेश भटगांवकर म्हणतात, कदाचित कटू वाटेल…पण सत्य सांगतोय, देशातील मोठी स्वायत्त विद्यापीठे, Goverment Medical Collages ही Mini-JNU होत आहेत…!

सुनील कांबळे म्हणतात, अश्या देशद्रोह्याना कठोर सजा झाली पाहिजे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.