मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकराल्यानंतर एकनाथ शिंदे प्रथमच औरंगाबाद दौ-यावर आहेत. या दौ-यादरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना, त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर भाष्य केले आहे. राज्यपालांचे वक्तव्य हे वैयक्तिक वक्तव्य आहे. आम्ही त्यांच्या विधानाशी सहमत नाही. मुंबईच्या विकासात मराठी माणसाचे योगदान कोणीही नाकारु शकत नाही. त्यांचे उद्योगधंद्यातील योगदान कोणालाही नाकारता येणार नाही. 106 हुतात्म्यांनी या मुंबईसाठी बलिदान दिले आहे. यामध्ये हिंदुह्र्दयसम्राट बाळासाहेबांचेही खूप योगदान आहे. मराठी माणसामुळे या मुंबईला वैभव आणि नावलौकिक प्राप्त झालेलं आहे. राज्यपाल हे राज्याचे एक प्रमुख आणि संविधानिक पद आहे. त्यामुळे कोणचाही अपमान त्यांच्याकडून होता कामा नये, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याशी आपण सहमत नसल्याचे म्हटले आहे.
( हेही वाचा: “मराठी माणसाला डिवचू नका!” राज ठाकरेंचा राज्यपालांना इशारा )
राज्यपालांचा खुलासा
नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो. कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये. किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वांचेच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचे योगदान अधिक आहे. असे ट्वीट राज्यपालांनी केले आहे.
Join Our WhatsApp Communityकारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये. किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वांचेच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचे योगदान अधिक आहे.
— Governor of Maharashtra (@maha_governor) July 30, 2022