Mumbai Job Advertise : मुंबईत मराठी माणसाची पुन्हा गळचेपी! नोकरी फक्त ‘नॉन-महाराष्ट्रीन’साठी; मनसेने दिला दणका!

279
Mumbai Job Advertise : मुंबईत मराठी माणसाची पुन्हा गळचेपी! नोकरी फक्त ‘नॉन-महाराष्ट्रीन’साठी; मनसेने दिला दणका!

मराठी माणसाला नोकरीत ‘नो एन्ट्री’ म्हणणाऱ्या कंपनीच्या मालकाने अखेर महाराष्ट्राची आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची माफी मागितली आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील मरोळ एमआयडीसी येथील ‘आर्या गोल्ड’ कंपनीकडून प्रोडक्शन मॅनेजर या पदासाठी एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मराठी माणसाला ‘नो एन्ट्री’ असं या जाहिरातीमधून सांगण्यात आलं होतं. दरम्यान, या प्रकरणात महाराष्ट्रात नवनिर्माण सेना (MNS) आक्रमक झाल्यानंतर कंपनीच्या मालकाने महाराष्ट्राची माफी मागितली आहे. आर्या गोल्ड (Aarya Gold) कंपनीचे मालक बंटी रुपरेजा (Bunty Rupreja) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मराठी जनतेचा माफी मागितली आहे. (Mumbai Job Advertise)

(हेही वाचा – Milind Deora यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी)

प्रकरण नेमके काय?

त्याचे झाले असे की, नोकरीसाठी जागांची माहिती देणाऱ्या एका वेबसाईटवर ही पोस्ट करण्यात आली आहे. मरोळ येथील ‘आर्या गोल्ड’ नावाच्या कंपनीतील डायमंड फॅक्टरीमध्ये (Diamond Factory) प्रोडक्शन मॅनेजरची (Production Manager) रिक्त जागा भरली जाणार आहे. या पदावर काम करणाऱ्याला दरमहा 25 हजार ते 62 हजार 760 रुपये इतका पगार दिला जाणार आहे. मात्र यासाठी एक अट घालण्यात आली आहे. या अटीचा या पोस्टमध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे. ती म्हणजे या नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा नॉन महाराष्ट्रीयन (Non Maharashtrian) हवा. दरम्यान, ही नोकरी पूर्ण वेळ असून दिवसाच्या शिफ्टमध्ये काम चालणार आहे. यासाठी 5 वर्ष अनुभव असलेला पुरुष उमेदवार हवा आहे. इथपर्यंत वाचून तुम्हाला सर्वकाही ठिक आहे, असंच वाटेल. मात्र नॉन महाराष्ट्रीयन हा शब्द वाचताच तळपायातील आग मस्तकात जाऊ शकते. (Mumbai Job Advertise)

दरम्यान, मनसे आक्रमक झाल्यानंतर ‘आर्या गोल्ड’ कंपनीबाहेर शंभर ते दीडशे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी मनसेचे कार्यकर्ते आर्या गोल्ड कंपनीमध्ये दाखल झाले होते. (Mumbai Job Advertise)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.