न्यायालयाने भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना जामिन मंजूर केल्यानंतर, सोमय्या सर्वांसमोर प्रकट झाले आहेत. आता समोर येताच किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. शुक्रवारी मी ठाकरे सरकारचा अजून एक घोटाळा बाहेर काढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता सोमय्या कोणता बाॅम्ब फोडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, त्यांनी मी नाॅट रिचेबल का झालो होतो याचही उत्तर देणार असल्याचेही सांगितले.
आणखी एक घोटाळा
किरीट सोमय्यांनी मागच्या वेळी सांगितल्याप्रमाणे, महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची डर्टी डझनची यादी दिली होती. त्यानुसार, अनिल देशमुख, श्रीधर पाटणकर, नवाब मलिकांची प्राॅपर्टी ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. तसेच, संजय राऊत, अजित पवार, हसन मुश्रीफ, सदानंद कदम इत्यादींची संपत्ती अटॅच करण्यात आली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या आता शुक्रवारी कोणता घोटाळा बाहेर काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
( हेही वाचा: धक्कादायक! प्रशिक्षणाविनाच पायलट उडवत होते विमान )
याला शिवसेनेचेही समर्थन होते
विक्रांतचा कार्यक्रम प्रतिकात्मक होता. विक्रांत वाचवण्यासाठी शिवसेनेने समर्थन दिले होते. संजय राऊत यांनी ऊद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले. रात्री एक वाजता माझ्यावर गुन्हा दाखल झाला, याला सेटींग म्हणतात, असा आरोप सोमय्या यांनी केला. नियमाप्रमाणे मी किंवा वकील जाऊ शकतात. आम्ही न्यायालयात सगळी माहीती देत आहोत, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले. 197-98 पासून विक्रांतची मोहीम सुरू झाली. विक्रांत वाचवण्यासाठी शिवसेनेने समर्थन दिले होते. असेही किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community