मुंबईची लाईफलाईन (Mumbai local railway) अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलची सेवा कोलमडली आहे. लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना सिग्नल मिळत नसल्याने मध्य रेल्वेचा (Central Railway) मोठा खोळंबा झाला आहे. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सध्या मध्य रेल्वेच्या लोकल २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत आहेत. यामुळे प्रवाशी संतप्त झाले आहेत. (Mumbai Local Railway Update)
(हेही वाचा – २६ नोव्हेंबर हा दिवस Indian Constitution Day म्हणून का साजरा केला जातो ?)
मध्य रेल्वेच्या बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ (Badlapur Railway Station) रुळाला तडे गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असले तरी मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे. रेल्वेची वाहतूक (Rail transport) विस्कळीत झाली आहे. सध्या मध्य रेल्वेच्या लोकल २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत असून, दरम्यान, कार्यालयात जाणारे कर्मचारी वर्ग महाविद्यालयीन विद्यार्थी संताप व्यक्त करत आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम सुरू आहे.
हेही पाहा –