Mumbai Local Update : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी… मध्य रेल्वेचा गर्दीवर उपाय, वेळापत्रकातही बदल

324
Mumbai Local Update : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी… मध्य रेल्वेचा गर्दीवर उपाय, वेळापत्रकातही बदल
Mumbai Local Update : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी… मध्य रेल्वेचा गर्दीवर उपाय, वेळापत्रकातही बदल

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुंबई विभागाच्या वेळापत्रकात ५ ऑक्टोबरपासून बदल करण्यात येणार आहे. नवीन वेळापत्रकानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून २० जलद लोकल फेऱ्या दादरवरून धावणार आहे. सीएसएमटी, दादर स्थानकातील प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. (Mumbai Local Update)

कोरोना, ताळेबंदीनंतर प्रवासाची संख्या वाढली असून, यांचा थेट परिणाम लोकल (Mumbai Local) सेवेवर होत आहे. परिणामी दररोज गर्दीतून धक्के खात प्रवाशांना लोकलने प्रवास करावा लागतो. बऱ्याचदा लोकलमध्ये बसण्यासाठी जागा मिळावी म्हणून प्रवासी दादर, भायखळ्यावरून सीएसएमटी गाठून पुन्हा कल्याणच्या दिशेने प्रवास करतात. आता वेळापत्रकात (Local Railway Time Table) बदल होणार असल्याने या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

(हेही वाचा – Cyber Crime : ​​आरोग्य सल्लागार असलेल्या महिलेची पावणे सहा कोटींची ऑनलाइन फसवणूक, पुण्यातून एकाला अटक)

सीएसएमटीवरून सध्या २५४ जलद लोकल धावतात. त्यातील अनेक लोकल पुरेसे फलाट नसल्याने उशीरा धावतात. तसेच सिग्नलमुळे अनेक लोकल सीएसएमटी-दादर दरम्यान बराचवेळ उभ्या असतात. याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी २० जलद लोकल सीएसएमटीऐवजी दादरवरून धावणार आहेत. त्यामुळे लोकल वेळेवर धावण्यास मदत होणार आहे. तसेच दादर येथील गर्दी विभाजीत होण्यास फायदा होईल, असेही रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

(हेही वाचा – मुस्लिम महिलेने शरीया कायद्याच्या विरोधातच दाखल केली High Court मध्ये याचिका) 

दरम्यान, एकूण १८१० लोकल फेऱ्या आहेत. यात मुख्य मार्गावरील २७० जलद फेऱ्यांचा समावेश आहे. १५ डबा जलद लोकलच्या २२ फेऱ्या रोज होतात. तर उर्वरित २४८ फेऱ्या या १२ डबा जलद लोकलच्या असतात.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.