मुंबईच्या महापौरांवर भ्रष्टाचाराचे आरोप; किरीट सोमय्या पोलिसांच्या ताब्यात 

148

 

मुंबई – भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर एसआरए घोटाळ्याचा गंभीर आरोप लावला. त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमय्या यांनी महापालिकेच्या मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. याप्रकरणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

“महापौर किशोरी पेडणेकर यांनी वरळी येथील गोमाता जनता एसआरएच्या (SRA) जागेचा गैरव्यवहार केला आहे. त्यांच्यावर ताबडतोब कारवाई व्हावी आणि त्यांची हकालपट्टी करावी. याबाबत आम्ही बीएमसी आणि एसआरएकडे कारवाईची मागणी केली आहे. पुरावेही सादर केले आहेत. जर दोन दिवसात महापौरांवर कारवाई झाली नाही, तर मी महापालिका समोर धरणा आंदोलन करेन, असा इशारा सोमय्या यांनी दिला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.