आदित्य ठाकरे युवराज पेंग्विन, तर शेलार आणि भातखळकरांना गुजरात पेंग्विन म्हणायच का?

120

मागच्या काही दिवसांपासून पेंग्विनवरुन राज्यात राजकारण सुरु आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका थांबताना दिसत नाहीये. सोमवारी महापौरांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. आदित्य ठाकरेंना पेंग्विन म्हणता, तर मग शेलार आणि भातखळकरांना गुजरातचे पेंग्विन म्हणायच का? असा सवाल महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला.

गुजरातच्या पेंग्विनची नावे आफ्रिकन

मुंबईच्या महापौरांनी गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणच्या पेंग्विन पार्कला भेट दिली होती. त्या म्हणाल्या की, गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणच्या पेंग्विन पार्कला भेट दिली होती. या पार्कमध्ये एकूण पाच पेंग्विन असून, त्यांची नावं ही सिमोन, पुंबा, नेमो, मुशू आणि स्वेन अशी आहेत. ही सर्व नावं आफ्रिकन असल्याचही किशोरी पेडणेकरांनी यांनी सांगितले. आता त्यांनी पुन्हा याच मुद्यावरुन भाजपवर टीका केली आहे. राणीच्या बागेतील एका पेंग्विनचा मृत्यू झाला, तेव्हा विरोधकांनी किती रान उठवलं होतं असेही त्या म्हणाल्या.

…तर लगेच गळा काढतील

गुजरातमध्ये प्रत्येक प्राणी पहायला वेगवेगळे शुल्क आकारले जाते. प्रत्येक सेक्शनला वेगळा आकार आहे. गुजरातमध्ये 200 रुपये किमान शुल्क आहे. मुंबईच्या राणीबागेत 25 ते 50 रुपये शुल्क घेऊन, संपूर्ण राणीबागेत फिरता येते. सर्व प्राणी पहाता येतात आम्ही इथे पैसे वाढवले, तर लगेच गळा काढतील असेही त्या म्हणाल्या. मी आणि मुंबईचे उपमहापौर तसेच राणीबागेचे संचालक संजय त्रिपाठी गुजरातमधील सायन्स सिटी येथे गेलो होतो. आम्ही प्रत्येकजण स्वखर्चानं तिथे गेलो होतो. मला आल्यावर बोलायचं नव्हतं, पण मुक्या प्राण्या-पक्ष्यांवरही राजकारण होतं आहे. त्यामुळे बोलावं लागत आहे. आम्ही तिथे पोहोचलो हे इथे कळलं आणि इकडे दणादण उलट्या सुरु झाल्या, असे म्हणत पेडणेकर यांनी भाजपवर निशाणा साधला.

( हेही वाचा: जर वाईन शेतक-यांच्या हिताची, तर गांजाची शेती करण्यासाठी परवानगी द्या! )

आम्ही मात्र विकासावरच बोलू

राणीबागेत जशी डॉक्टरांची तज्ञ टीम आहे, तशी गुजरातमध्ये तज्ञ डॉक्टरांची टीम नाही. गुजरातमधील पेंग्विन कक्षात जे डॉक्टर आहेत तेदेखील मुंबईतूनच आपल्याकडचा अनुभव घेऊन तिकडे गेले आहेत, अशा पेडणेकर म्हणाल्या. गुजरातमधील सायन्स सिटीत प्रत्येक ठिकाणी पैसे घेतले जातात. तिथे बस पैशानं आणि आणि उठ पैशानं होते. पण मुंबईत काही आम्ही चांगलं करायला गेलो, की पैसे वाढवले, भ्रष्टाचार केला असे भाजपचे काही लोक म्हणत असल्याचे, पेडणेकर म्हणाल्या. आशिष शेलार जे माझ्याबद्दल बोलला होतात त्याबद्दल आधी सर्व महिला वर्गाची माफी मागा, असेही त्या म्हणाल्या. गुजरातमधील कंत्राटदार मला बोलला की, आम्ही फक्त दिल्लीशी बोलतो. कारण दिल्लीतूनच सगळं होत आहे. इथे आक्षेप घेताय, मग तिथे का नाही? असा सवालही यावेळी पेडणेकर यांनी भाजपला केला. काहीजण डोकी फोडू, दंगली करू अशी वक्तव्ये करत आहेत, आम्ही मात्र विकासावरच बोलणार असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.