महापौरांना पुन्हा आठवले कोरोना स्प्रेडर! म्हणाल्या…

कोरोनाच्या तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना आवाहन केले आहे. तिसरी लाट ही विस्फोटक आणि भयंकर असू शकते त्यासाठी आपणच योग्य ती काळजी घेणं गरजेच आहे, असं त्या यावेळी म्हणाल्या. तसेच, कोरोनाच्या विरुद्ध मोहिम हाती घ्यायलाच हवी. मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न सुरु आहेत. सर्वांनीच त्यांना साथ द्यायला हवी समारंभ उरकत असताना, गर्दी होऊ नये, आणि आपण सुपर स्प्रेडर बनू नये याची सर्वांनी काळजी घ्यायला हवी असही त्यांनी स्पष्ट केलं.

महापौरांनी केलं आवाहन

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या ही धोकादायक आहे. त्यामुळे गर्दीत जाणं कटाक्षाने टाळा. तसेच, लग्नसमारंभ, प्रोग्राम हे सार आपण स्वत:हून टाळायला हवं, खर तर अशा समारंभात आपणच जाऊ नये. पण, जाव लागलं तर कोरोनाच्या त्रिसूत्रीच पालन करा. कमी लोकांमध्ये समारंभ उरका असं आवाहन महापौरांनी यावेळी केलं आहे. त्यापुढे असेही म्हणाल्या की, पुन्हा लॉकडाऊन होऊ नये म्हणून सावध झालं पाहिजे. सुपर स्प्रेडर होऊ नका. मास्क लावा, वॉशेबल मास्क वापरला तरी चालेल. ती काळजी घेतली तर लॉकडाऊन लागणार नाही. कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. 20 हजाराचा आकडा येऊ देऊ नका. दुसरी लाट आपण थोपवून जिंकलो. आता ही लढाईही तुमच्या सहकार्याने जिंकायची आहे.

( हेही वाचा: ‘ओबीसीवर माझा फारसा विश्वास नाही’ )

तर होणार लाॅकडाऊन  

मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न सुरु आहेत. सर्वांनीच त्यांना साथ द्यायला हवी समारंभ उरकत असताना, गर्दी होऊ नये, आणि आपण सुपर स्प्रेडर बनू नये याची सर्वांनी काळजी घ्यायला हवी असही त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईत 20 हजार कोरोनाबाधित झाल्यास लाॅकडाऊन लावण्यात येईल असे मुंबईच्या आयुक्तांनी केलेल्या वक्तव्याला महापौरांनी दुजोरा दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here