मेट्रोमुळे केवळ वातावरणातीलच नव्हे, तर राजकीय प्रदूषणही होणार कमी; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले

129

मुंबई मेट्रो-3 च्या ट्रायल चाचणीला 30 ऑगस्टला मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बुधवारी विघ्नहर्त्याचे आगमन होत असून, त्याने राज्यावरील विघ्न दूर केली आहेत. मेट्रो प्रकल्पामुळे वातावरणातील प्रदूषण कमी होईलच त्याशिवाय राजकीय प्रदूषणही कमी होणार असल्याचे, म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.

सार्वजनिक वाहतूक चांगली असेल तर त्याचा वापर सगळे करतील. आमचे सरकार आल्यानंतर, अश्विनी भिडे यांना मेट्रोची जबाबदारी देण्याचा पहिला आदेश काढला. या कामासाठी झोकून देणारा अधिकारी हवा होता, असे म्हणत त्यांनी अश्विनी भिडे यांचे कौतुक केले.

मुंबईतील वाहतूक कोंडीवर रामबाण उपाय 

मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पाला अनेकांनी विरोध केला होता. पण हा प्रकल्प सुरु केला. लवकरच नागपूर ते शिर्डी दरम्यानचा टप्पा सुरु होणार असल्याचे, त्यांनी सांगितले. मुंबई मेट्रो हा मुंबईकरांच्या हिताचा प्रकल्प असल्याचे, मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईतील वाहतूक कोंडीवर हा मेट्रो प्रकल्प रामबाण उपाय ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

( हेही वाचा: Metro-3: “हा ऐतिहासिक क्षण, आता ही मेट्रो धावण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही”,उपमुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला )

लोकांच्या हितासाठी असणारे प्रकल्प पूर्ण करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, पर्यावरणाचा समतोल राखणे हे सगळ्यांचे काम आहे. या ठिकाणी तीन रस्ते आहेत. जंगलात जाऊन पूर्णपणे वृक्षतोड झाली नसल्याचे, मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या प्रकल्पाची स्थगिती आम्ही उठवली आणि काम सुरु केले. लोकांच्या हितासाठी असणारे प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे, त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.