Ashwini Bhide : महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांना ब्रिटिश एअरवेजकडून वर्णभेदाचा अनुभव? 

2116

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांनी ब्रिटिश एअरवेजचे प्रीमियम क्लासचे तिकीट काढले असताना प्रत्यक्षात त्यांना इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करण्यास सांगितले. त्याची भरपाई दिली नाही, त्यामुळे अश्विनी भिडे तीव्र संतापल्या, त्यांनी हा अनुभव ट्विट केले, त्यात त्यांनी हा ब्रिटिश एअरवेजकडून वर्णभेद केला जात आहे का? असा आरोप केला.

अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांनी आधीच ब्रिटिश एअरवेजचे प्रीमियम क्लासचे तिकीट काढले होते. जेव्हा त्या प्रत्यक्षात प्रवासाला गेल्या तेव्हा त्यांना चेक इन काउंटरवर चक्क प्रीमियम क्लासचे बुकिंग फुल झाले आहे. त्यामुळे त्यांना इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करावा असे सांगण्यात आले. असे करताना कुठलीही भरपाई दिली नाही. त्यामुळे अश्विनी भिडे यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी ट्विट करत सांगितले की, तुम्ही लोकांची फसवणूक, भेदभाव किंवा  वर्णभेद करता का? कुठलीही भरपाई न देता ओव्हबुकिंग्सच्या खोट्या सबबी सांगून चेक इन काउंटरवर प्रीमियम इकोनॉमी तिकीट काढलेल्या प्रवाशाला ऐनवेळी इकोनॉमी सीटवरून प्रवास करायला लावता. ब्रिटिश एअरवेज प्रवाशांबरोबर नेहमी अशीच वागते का?

(हेही वाचा Devendra Fadanvis : राम काहीही खाऊ द्या; पण तुम्ही मात्र शेण खाल्लं; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल)

अश्विनी भिडे (Ashwini Bhide) म्हणाल्या, तुम्ही डीजीसीएच्या (Directorate General of Civil Aviation) नियमांचे उल्लंघन करता असे ऐकले होते. मला यावेळी ते पहिल्यांदाच जाणवले. दरम्यान, अश्विनी भिडे यांनी त्यांच्या एक्सवरील पोस्टद्वारे नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे ब्रिटिश एअरवेजची तक्रार केली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.