“मुंबई महानगरपालिका अभी बाकी है”; ट्वीटरवरुन भाजपचा उद्धव ठाकरेंना इशारा

183

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर, आता राज्यात भाजपचे सरकार येणार हे निश्चित आहे. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर, मुंबई भाजपने ट्वीट केले आहे. “यह तो झांकी है मुंबई महानगरपालिका अभी बाकी है”, असं ट्वीट मुंबई भाजपने केले आहे. या ट्वीटमध्ये  देवेंद्र फडणवीस यांचा हातात बॅट घेतल्याचा फोटो आहे. या ट्वीटच्या माध्यमातून भाजपने उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे.

मुंबई महानगरपालिका जगातील सर्वात मोठी आणि आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. मागच्या अनेक वर्षांपासून महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या शिवसेनेकडेच आहेत. आता हीच पालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपने कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबई पालिकेवरील माफिया सरकार घालवू

भाजप मुंबईच्या ट्वीटनंतर, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील ट्वीट केले आहे. “महाराष्ट्रातील माफीया सरकार गेलं आता मुंबई महानगरपालिका माफिया सरकार आम्ही घालवू”, असं ट्वीट किरीट सोमय्या यांनी केले आहे. मागच्या काही महिन्यांमधील भाजपची मुंबईतली रणनिती पाहिली तर पोलखोल सभा, मुंबई महानगपालिकेत होणारा भ्रष्ट्राचार भाजपने सातत्याने पुढे आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता महानगपालिका भाजपचे लक्ष्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.

( हेही वाचा: खुर्ची सोडली! आता उद्धव ठाकरेंसमोर ‘ही’ आहेत प्रमुख आव्हाने )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.